नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:36+5:302021-08-17T04:45:36+5:30

ठाणे : विरोधी पक्ष कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास केंद्रीय ...

Narendra Modi is the Prime Minister again in 2024 | नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान

नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान

Next

ठाणे : विरोधी पक्ष कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केला. नियोजित नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले जावे, ही भूमिपुत्रांचीच इच्छा आणि मागणी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला.

ठाणे जिल्ह्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच समावेश झालेल्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पाच दिवस जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचा प्रारंभ ठाण्यातील आनंदनगर चेकनाका येथून सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास झाला. त्यानंतर ठाणे शहरातील इंदिरानगर, वागळे इस्टेट, नितीन कंपनी, पाचपाखाडी मार्गे ही यात्रा मासुंदा तलाव येथे आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांकडे आपले मनोगत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, मोदी हे जनताभिमुख कारभार करीत आहेत. त्यांच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या भाषणाला देशातील तरुणाईने चांगले रँकिंग दिले आहे. देशाची युवा पिढी आणि जनता मोदींचे नेतृत्व मान्य करते. राजकारणाची दिशा वेगळी करण्यासाठी देशातील विरोधी पक्षनेते एकत्र येत आहेत. कितीही पक्ष एकत्र आले तरी २०२४ मध्ये मोदी हेच पंतप्रधान होतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

* दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले जावे, ही मागणी जरी आपण लोकसभेत २०१५ मध्ये केली असली तरी ती केवळ आपली वैयक्तिक मागणी नसून ती भूमिपूत्रांची मागणी आहे. मात्र राज्य शासनाने सिडकोच्या माध्यमातून प्रस्ताव पारीत करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची भूमिका घेतली. नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनीही भूमिपुत्रांच्या दिबांच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

* ठाण्याला केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानेच आभार

जनतेमुळे खासदार आणि मोदींमुळे मंत्री झालो. प्रधानमंत्र्यांच्या सूचनेवरून लोकांची कामे करण्यासाठी व जनआशीर्वाद घेण्याकरिता निघालो आहे. यात निवडणुकांचा काहीही संबंध नाही. ७४ वर्षांनी ठाण्याला मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाल्यानेच आभार प्रदर्शनासाठी ही यात्रा असल्याचा दावाही पाटील यांनी केला.

* या वेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि अ‍ॅड. संदीप लेले यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

.......

वाचली

Web Title: Narendra Modi is the Prime Minister again in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.