मराठा आंदोलनावरुन नरेश म्हस्के, जितेंद्र आव्हाडांमध्ये आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 08:39 AM2023-09-16T08:39:47+5:302023-09-16T08:40:28+5:30
Thane: आरक्षणासाठी मराठा क्रांती दलाच्यावतीने शांततेत आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन कसे पेटेल, दंगे कसे होतील याचे नियोजन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.
ठाणे - आरक्षणासाठी मराठा क्रांती दलाच्यावतीने शांततेत आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन कसे पेटेल, दंगे कसे होतील याचे नियोजन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यामध्ये उबाठा पक्षाचे काही नेतेदेखील सामील होते, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी केला.
म्हस्के म्हणाले की, जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार गेले नाहीत. यावर संजय राऊत यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
- ‘शिवसेना पक्षाची वाट लावणारे’ अशी संजय राऊत यांची ओळख आहे. पक्ष संपविण्याची शरद पवार यांची सुपारी राऊत यांनी घेतली आहे.
- हेच राऊत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कोणत्या भाषेत टीका करीत होते हे आम्हाला बोलायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला.
- आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे हेच सोडवू शकतात, हे जरांगे पाटील यांनी सांगितल्याने विरोधकांची हवाच निघून गेल्याचा टोला त्यांनी लगावला.
- हे सत्तेत होते, त्यावेळी दुष्काळ पडला होता; तेव्हा आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफची पडली होती. त्यामुळे त्यांचा दौरा हा दिखावा आहे.
नरेश म्हस्के यांनी काय आरोप केले, त्याबाबत मला काहीच बोलायचे नाही. परंतु म्हस्के यांना उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. यापेक्षा आपल्याला या विषयावर अधिक भाष्य करायचे नाही.
- जितेंद्र आव्हाड,
आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस