आमदारकीचे परफेक्ट मटेरियल म्हणजे नजीब मुल्ला - नरेश म्हस्के

By अजित मांडके | Published: January 20, 2023 06:07 PM2023-01-20T18:07:17+5:302023-01-20T18:07:24+5:30

नजीब मुल्ला हे आमदारकीचे परफेक्ट मटेरियल असल्याचे नरेश मस्के यांनी म्हटले आहे. 

 naresh mhaske said that najeeb mulla is the perfect material of mla  | आमदारकीचे परफेक्ट मटेरियल म्हणजे नजीब मुल्ला - नरेश म्हस्के

आमदारकीचे परफेक्ट मटेरियल म्हणजे नजीब मुल्ला - नरेश म्हस्के

googlenewsNext

ठाणे: नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. मात्र, त्या खाली राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत. त्यामुळे हा बॅनर शिंदे गटाने लावण्याचा प्रश्न नसल्याचे स्पष्ट करीत, नजीब मुल्ला हे जेष्ठ व अभ्यासू नगरसेवक असून ते आमदारकीसाठी परफेक्ट मटेरियल असल्याचे मत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. त्यांच्या वक्तव्यामुळे भविष्यातील शिंदे गटाचे कळवा - मुंब्रा मतदार संघाचे आमदारकीचे उमेदवार मुल्ला तर नाहीत ना असे तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहे.

कळवा मुंब्रा भागात माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या फलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचे फोटो लावण्यात आल्याने राजकीय वातवरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात अनेक चर्चना उधान आले आहे. याबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना विचारले असता, मुल्ला यांच्या वाढदिवसाचे जे बॅनर लागलेले आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवकांचे फोटो आहेत. या बॅनरवर आमचे फोटो लावले असतील पण, ते बॅनर राष्ट्रवादीचेच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक अशा प्रकारचे बॅनर लावत असतील तर, त्यावर आमची प्रतिक्रिया घेण्य ऐवजी, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना त्याबाबत विचारावे असे सांगितले. जर राष्ट्रवादीचे नगरसेवक आमचे फोटो बॅनरवर लावत असतील तर आम्हाला नक्कीच आनंद आहे, असा चिमटा देखील त्यांनी यावेळी काढला. 

मुल्ला हे खूप चांगले कार्यकर्ते, अभ्यासू  जेष्ठ नगरसेवक आहेत. तसेच आमदारकीसाठीचे सर्वगुण मुल्ला यांच्या असल्यामुळे ते आमदारकीचे परफेक्ट मटेरियल असल्याचे देखील त्यांनी संगीतले. जर ते आमच्यात येणार असतील तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. परंतु अद्याप असा काही विषय नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.


 

Web Title:  naresh mhaske said that najeeb mulla is the perfect material of mla 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.