ठाण्यातील अभिनय कट्टयावर सत्कार महापौरांचा कार्यक्रमात नरेश म्हस्के यांचा सत्कार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 05:06 PM2019-11-25T17:06:26+5:302019-11-25T17:09:50+5:30

अभिनय कट्टा व्यासपीठाने आजवर अनेक कलाकृती आणि सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले.कट्टा ४५६ हा असाच एक आगळावेगळा कार्यक्रम होता  

Naresh Mhaske was honored at the mayor's program in Thane | ठाण्यातील अभिनय कट्टयावर सत्कार महापौरांचा कार्यक्रमात नरेश म्हस्के यांचा सत्कार  

ठाण्यातील अभिनय कट्टयावर सत्कार महापौरांचा कार्यक्रमात नरेश म्हस्के यांचा सत्कार  

Next
ठळक मुद्दे अभिनय कट्टयावर सत्कार महापौरांचानरेश म्हस्के यांचा सत्कार उपमहापौर *पल्लवी कदम* ह्यांचा सत्कार

ठाणे : .ठाण्याचे नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के यांच्या सत्काराचा कार्यक्रम अभिनय कट्ट्यावर आयोजित करण्यात आला. अभिनय कट्टयावर  "सत्कार महापौरांचा" या कार्यक्रमात नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के  यांचा नागरी सत्कार  अभिनय कट्टा, संगीत कट्टा, वाचक कट्टा, दिव्यांग कला केंद्र, अभिनय कट्ट्याचे एकोपा ज्येष्ठ नागरिक संघ तसेच हनुमान क्रिडा मंडळ चिखलवाडी, शिव अर्पण मित्र मंडळ भानजीवाडी,शिवस्मृती मित्र मंडळ, पम्पिंग स्टेशन रहिवाशी, अचिव्हर्स ग्रुप, बी कॅबिन येथील विविध मंडळ, नौपाडा  विभागातील विविध मंडळांच्या व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. 

              संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून अभिनय कट्ट्यावर नेपथ्यातून नरेश म्हस्के यांचा जीवनप्रवास साकारण्यात आला.कॉलेज प्रमुख ते महापौर पर्यंतचा चढता आलेख नेपथ्याच्या माध्यमातून व नरेश म्हस्के ह्यांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य या नेपथ्याद्वारे सुरेख पद्धतीने मांडण्यात आले तसेच.पंकज निरकर ह्याने  नरेश म्हस्के ह्यांच्या छायाचित्रांची रांगोळी  साकारली होती. या सत्काराच्या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणापैकी एक आकर्षण हुबेहूब काढलेली रांगोळी.

        अजातशत्रू नरेश म्हस्के यांचा आजवरचा प्रवास नृत्यनाटयाद्वारे सादर करण्यात आला.अभिनय कट्ट्याच्या बालसंस्कार शास्त्रातील बालकलाकारांनी शिवसेना गीतावर नृत्य सादर करून महापौरांचे स्वागत केले.सदर सादरीकरणात श्रेयस साळुंखे,चिन्मय मोर्ये,पूर्वा तटकरे,वैष्णवी चेऊलकर,रुचिता भालेराव,स्वस्तिका बेलवलकर,अमोघ डाके,प्रथम नाईक,महेश झिरपे,आकाश माने,अभय पवार आणि परेश दळवी ह्यांनी सहभाग घेतला.सादर नृत्याचे दिग्दर्शन अभिनय कट्ट्याचा कलाकार परेश दळवी ह्याने केले.संगीत कट्ट्याचे कलाकार अरुण कुमार,भरत शोत्री,दिलीप नारखेडे,मोरेश्वर ब्राह्मणे,पांडुरंग कदम,पूजा सुळे,संदीप गुप्ता,सुधाकर कुलकर्णी,विजया जोशी,सुरेश राजगुरू,उदय आठवले,वासुदेव फणसे,विजय कर्वे,प्रमोद खुतु ह्यांनी विविध गीतांचे सादरीकरण केले.त्यानंतर किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून व अथर्व नाकती याने संकलित केलेली  महापौर नरेश म्हस्के यांच्या संघर्षमय प्रवासाची  चित्रफीत दाखवण्यात आली.आनंदनगर वसाहत ते त्यांचा आजपर्यंत चा संघर्षमय जीवनप्रवास या चित्रफितीतुन  बघताना उपस्थित सर्वानाच अश्रू अनावर झाले.अभिनय कट्टा, संगीत कट्टा, वाचक कट्टा तर्फे महापौर नरेश म्हस्के ह्यांना त्यांच्या सुंदर छायाचित्राची फोटोफ्रेम भेट देण्यात आली. दिव्यांग कला केंद्र आणि नरेश म्हस्के ह्यांच नातं खूप खास आहे.मुलांसाठी महापौर नरेश म्हस्के हे त्यांचे लाडके नरेश काका.मुलांनी आपल्या महापौर काकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.दिव्यांग कला केंद्रातर्फे मुख्याध्यापिका संध्या नाकती आणि मुलांनी काढलेल्या चित्राची फोटोफ्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला.तसेच दिव्यांग कला केंद्रांतर्फे स्वामी समर्थाची मूर्ती शुभेच्छा स्वरूपात दिली. "बघायला गेलं तर हे यश माझे नाहीच मुळी, होत ते तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा,आशिर्वाद व आजवर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ ,...अशा पवित्र भावनांचा "सोहळा" आहे माझ्यासाठी.आज महापौर पदाच्या निवडी निमित्त सर्वच क्षेत्रातील थोरा-मोठ्यांनी  दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो व सोबतच भविष्यात काही चुका माझ्याकडुन झाल्या किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले तर त्याबद्दल कान धरण्याचाही अधिकार देतो! असे मत महापौर नरेश म्हस्के ह्यांनी व्यक्त केले . तसेच ठाण्यातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांमार्फत महापौर आणि उपमहापौर *पल्लवी कदम* ह्यांचा सत्कार करण्यात आला.

    महापौर नरेश म्हस्के म्हणजे एक संघर्षमय प्रवास एक सामान्य कार्यकर्ता ते ठाण्याचा प्रथम नागरिक .ह्या नरेश पर्वाचे ठाणेकर साक्षीदार आहेत .हा सत्कार त्यांच्या संघर्षाचा त्यांच्या कर्तृत्वाचा सत्कार आहे.एका निष्ठावंत, प्रतिभावंत कार्यकर्त्याला मिळालेला सन्मान म्हणजे हे महापौर पद आहे. आजचा नागरी सत्कार म्हणजे अभिनय कट्टा व समस्त ठाणेकरांकडून आपल्या प्रथम नागरिकाचा  केलेला हा सत्कार आहे असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे निवेदन कल्पेश डुकरे ह्यांनी केले.

Web Title: Naresh Mhaske was honored at the mayor's program in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.