मुल्ला यांच्या वाढदिवसाला नरेश म्हस्के यांची हजेरी, शिंदे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब
By अजित मांडके | Published: January 21, 2023 03:08 PM2023-01-21T15:08:19+5:302023-01-21T15:08:32+5:30
नजीब मुल्ला यांच्या वाढिदवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आल्याने मुल्ला शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरु होती.
ठाणे : नजीब मुल्ला यांच्या वाढिदवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आल्याने मुल्ला शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमिवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि भाजपच्या काही मंडळींनी मुल्ला यांच्या वाढदिवसाला हजेरी लावल्याने चर्चा सुरू आहेत. म्हस्के यांनी पुन्हा मुल्ला हे आमदार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मुल्ला यांनी देखील एखाद्याला अशी इच्छा वाटत असेल तर त्यात चुकीचे काय आहे, असे सांगत ज्यांना याचा त्रस होत असले त्यांनी त्यांचे बघुन घ्यावे असा टोला आपल्याच पक्षातील काही मंडळींना लगावल्याचे दिसून आले.
कळवा मुंब्रा भागात माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढिदवसाच्या शुभेच्छांच्या फलकांवर मुख्यमंत्नी एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचे फोटो लावण्यात आल्याने राजकीय वातवरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात अनेक चर्चना उधान आले आहे. त्यात जर राष्ट्रवादीचे नगरसेवक आमचे फोटो बॅनरवर लावत असतील तर आम्हाला नक्कीच आनंद आहे, असा चिमटा म्हस्के यांनी काढला आहे.
दरम्यान ही चर्चा सुरु असतांनाच मुल्ला यांच्या वाढदिवसाला नरेश म्हस्के यांनी हजेरी लावल्याने या चर्चावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी देखील म्हस्के यांनी मुल्ला यांचे तोंडभरुन कौतक केले. त्यांचे कौतुक करीत असतांना, शेरो, शायरी सादर करीत त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांना छेडले असता, त्यांनी पुन्हा मुल्ला हे अभ्यासु आहेत, त्यामुळे त्यांनी आमदार व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले. त्यात राष्ट्रवादीच्या उपस्थित कार्यकत्र्यानी देखील मुल्ला यांनी आमदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे एक प्रकारे मुल्ला यांनी शक्तीप्रदर्शन केल्याची चर्चा देखील आता सुरु झाली आहे. तर नजीब मुल्ला यांनी मात्र सावध प्रतिक्रिया यावेळी दिली. २००२ ला जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडणूक गेले त्यावेळी आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यावेळी सभागृह नेते होते. त्याआधी राजन विचारे हे सभागृह नेते होते. त्यामुळे आमचे सर्वच मित्रमंडळी असून कोणी आमदारकीसाठी मला शुभेच्छा दिल्या तर त्याचा वेगळा अर्थ काढणे ही अपरिपक्वता असल्याचे मुल्ला यांनी स्पष्ट केले आहे.