मेरी आवाज मेरी पहचान कराओके स्पर्धेत नंदन जोशी व शर्मिष्ठा बासू प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 04:56 PM2019-08-22T16:56:36+5:302019-08-22T16:59:58+5:30
मेरी आवाज मेरी पहचान कराओके स्पर्धा संपन्न झाली.
ठाणे : सूरसुदान शौर्या स्वर संस्थेतर्फे आयोजित मेरी आवाज मेरी पहचान 2019 कराओके फक्त हिंदी चित्रपटातील युगल गाण्यांच्या स्पर्धेची अंतिम फेरी डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी सभागृह ठाणे येथे संपन्न झाली. कराओके स्पर्धेत नंदन जोशी व शर्मिष्ठा बासू प्रथम आले.
या स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस समारंभ सोहळा संस्थेचे संस्थापक किरण राणे, प्रशांत काळुंद्रेकर आणि आनंद मेनन या परीक्षक यांच्या हस्ते झाला. प्रथम क्रमांक नंदन जोशी व शर्मिष्ठा बासू ,द्वितीय क्रमांक प्रसाद पाटील व विजया प्रधान आणि तृतीय क्रमांक नंदन जोशी व दत्तप्रसाद अंबर्डेकर यांनी मिळवला. प्रभाकर केळकर/विजया केळकर, व्यंकटेश कुलकर्णी/ वृषाली साने, राजेंद्र पांचाळ/निशा पांचाळ, देवेंद्र पुरोहित/ राखी शहा आणि सोहम स्वामी/रेणुका राजदेरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. सहभागींनी उस्त्फुर्तपणे आपला सहभाग दर्शविला. या कार्यक्रमात इंटरनॅशनल मीडिया इव्हेन्ट मॅनजमेंटचे अध्यक्ष विरेंद्र शंकर उपस्थित होते व त्यांनी 20 नावे यावेळी घोषित केली व त्यातील निवडकांना ते मोठ्या मंचावर संधी देणार आहेत. संस्थेतर्फे एकल व युगल गायनाची स्पर्धा उत्तम प्रतिसाद व यशस्वीरित्या पार पडल्यानंतर पुढील स्पर्धा ही गट गायनाची ऑक्टोबर महिन्यात भरवण्यात येईल अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष सागर जोशी यांनी दिली.