नर्मदा सुखा आणि बाढ या चक्रात अडकली आहे - मेधा पाटकर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 4, 2024 08:54 PM2024-05-04T20:54:56+5:302024-05-04T21:01:26+5:30
अत्रे कट्ट्याच्यावतीने शनिवारी पाटकर यांच्यासह गीता शाह यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविले. यावेळी पाटकर पुढे म्हणाल्या की, आज अमेरिकेने १९५१ धरणे तोडून नद्या खुल्या केल्या आहेत.
ठाणे : अवैध रेत खाणी या नर्मदेला संपवत आहे. राजकीय आशिर्वाद असलेले कार्य थांबवू शकत नाही. नर्मदा संपत आहे, पाणी अशुद्ध असून ते पिण्यायोग्य नाही, नर्मदा सुखा आणि बाढ या चक्रात अडकली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी ठाण्यात व्यक्त केले.
अत्रे कट्ट्याच्यावतीने शनिवारी पाटकर यांच्यासह गीता शाह यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविले. यावेळी पाटकर पुढे म्हणाल्या की, आज अमेरिकेने १९५१ धरणे तोडून नद्या खुल्या केल्या आहेत. युरोपने चार हजारांच्यावर धरणे तोडली आहे. पण आपल्या भारताने अजूनही ही संकल्पना अंमलात आणली नाही. आज पुनर्वसनाची ३८ वर्षे पुर्ण झाली. ज्यांना विस्थापीत म्हणून उल्लेखले जात नव्हते त्या सर्वांसाठी आदेश काढत काढत आम्हाला ५० हजार कुटुंबाचे पुनर्वसन साध्य करता आले. त्या पलिकडेही काही हजार कुटुंबे बाकी आहेत.
आज रेती, सिमेंट यांपासून नद्या वाचवायच्या आहेत, देशाची भूमी वाचवायची आहे. म्हणून आम्ही पर्यायांवर काम करु इच्छितो. प्रत्येक गावा, शहराच्या वस्तीत दवाखान्यात हवे, त्यामध्ये पॅरामेडीकल वर्कर्सचे जास्त स्थान आम्हाला हवे आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संविधानाने जगण्याचा, आजिविकेचा अधिकार ज्यांना मिळत नाही, त्यांच्या नजरेतून एक प्रकारे संविधान तुडवले जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.