नरपडमध्ये पत्नीची पतीकडून हत्या

By Admin | Published: March 2, 2016 01:40 AM2016-03-02T01:40:03+5:302016-03-02T01:40:03+5:30

डहाणू तालुक्यातील नरपड गावातल्या जागृती सुरती (२४) या विवाहीत महिलेची पती रॉनी सुरती याने २९ फेब्रुवारी रोजी बारा वाजण्याच्या सुमारास डोक्यात वीट मारून हत्या केली.

Narupad murdered wife's wife | नरपडमध्ये पत्नीची पतीकडून हत्या

नरपडमध्ये पत्नीची पतीकडून हत्या

googlenewsNext

बोर्डी : डहाणू तालुक्यातील नरपड गावातल्या जागृती सुरती (२४) या विवाहीत महिलेची पती रॉनी सुरती याने २९ फेब्रुवारी रोजी बारा वाजण्याच्या सुमारास डोक्यात वीट मारून हत्या केली. रॉनी हा व्यसनी व बेरोजगार असून कौटुंबिक वादातून हत्या घडली. डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
नरपड ग्रामपंचायतीलगत साईनाथवाडी या दलित वस्तीत जागृती व रॉनी सुरती हे दाम्पत्य राहत होते. त्यांना क्युन्सी ही पाच वर्षाची मुलगी आहे. रॉनी व्यसनी व बेरोजगार होता. त्यामुळे पती-पत्नीत नेहमी भांडण होत असे. दोन महिन्यापूर्वी भांडण विकोपाला गेल्याने जागृती त्याच वस्तीतील माहेरी राहू लागली. सोमवार २९ फेबु्रवारी रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जागृतीला त्याने घराबाहेर बोलावून तिच्या डोक्यावर विट हाणली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जागृतीने आरडाओरडा केला मात्र कुटुंब मदतीला धावण्याअगोदर रॉनीने पलायन केले. जागृतीचा जागीच मृत्यू झाला. भावेश (भाऊ) व उषा (आई) यांनी तत्काळ डहाणू पोलीसांना खबर दिली. आगर येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर नरपड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान रॉनीचे जागृतीवर एकतर्फी प्रेम होते. दडपशाही व बदनामीची धमकी दिल्याने कुटुंबाने जागृतीचे रॉनीशी लग्न ठरविले मात्र लग्नाची तारीख ठरल्यानंतरही त्याने ९ दिवस अगोदरच आपल्याशी जबरदस्तीने लग्न करण्यास तिला व तिच्या कुटुंबियांना भाग पाडले होते अशी माहिती जागृतीचा मोठा भाऊ तुळशीदास याने दिली. डहाणू पोलीसांनी गुन्हा नोंदविला असून फरारी आरोपीचा शोध सुरू केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Narupad murdered wife's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.