नासीरच्या चौकशीत सात गुन्हे उघडकीस

By admin | Published: May 17, 2017 02:03 AM2017-05-17T02:03:26+5:302017-05-17T02:03:26+5:30

सोनसाखळी चोर नासीरने ठाणे आणि परिसरात सात गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मंगळवारी ठाणे न्यायालयाने त्याला २५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Naseer's investigation reveals seven crimes | नासीरच्या चौकशीत सात गुन्हे उघडकीस

नासीरच्या चौकशीत सात गुन्हे उघडकीस

Next

- जितेंद्र कालेकर। लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सोनसाखळी चोर नासीरने ठाणे आणि परिसरात सात गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मंगळवारी ठाणे न्यायालयाने त्याला २५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने अलिकडेच नासीर हाफीज खान उर्फ सलीम अली उर्फ इराणी (३५, रा. अंबिवली, कल्याण) याला दिल्लीतील तिहार कारागृहातून ५ मे रोजी अटक केली.
सोनसाखळी चोरी, मोटारसायकल चोरी, फसवणूक, दंगल माजविणे, पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक लुटमार करणे, तसेच पोलिसांवर हल्ले करणे अशा ७३ गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची दिल्ली, मुंबईसह देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये आहे. त्याने ठाण्यातील चितळसर आणि राबोडीतील प्रत्येकी दोन तर नौपाडा, कापूरबावडी आणि वर्तकनगर येथील प्रत्येकी एक अशा सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
ठाणे, कल्याणमध्ये सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्यानंतर नासिरने दिल्लीत फातिमा हिच्याकडे आश्रय घेतला होता. त्याने अन्यत्र कुठे जाऊ नये, म्हणून फातिमाने मुलीबरोबर त्याचे लग्न लावले. त्याचे पहिले लग्न झाले असून, पहिली पत्नी अंबिवली भागात वास्तव्याला आहे. दरम्यान, त्याच्या आणखी साथीदारांसह त्याची सासू फातिमाचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फातिमचा शोध सुरू
भारतातील कुख्यात सोनसाखळी चोरटयांना आश्रय देणाऱ्या फातिमा उर्फ मामा जाफरअली या दिल्लीतील महिलेचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस शोध घेत आहेत. तिने आतापर्यंत नासीर सारख्या अनेक चोरटयांना आश्रय दिल्याची माहिती उघड झाली आहे. ठाणे, मुंबई, कल्याण तसेच दिल्ली, कलकत्ता, कर्नाटक, केरळ, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथीस कुख्यात सोनसाखळी चोरटयांना तिने दिल्लीतील घरी आश्रय दिला आहे. त्याबदल्यात त्यांच्याकडून चोरीतील ३० टक्के ऐवज किंवा रोकड वसूल करीत होती.

Web Title: Naseer's investigation reveals seven crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.