महापालिका आयुक्तांनी दिले डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 06:16 PM2018-11-13T18:16:59+5:302018-11-13T18:18:20+5:30

मालमत्ता कर वसुली करण्याबाबत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार डिसेंबर अखेर पर्यंत ५०० कोटी रुपये वसुल करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Nashik Municipal Corporation has given 500 crore property tax recovery by December end | महापालिका आयुक्तांनी दिले डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट

महापालिका आयुक्तांनी दिले डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देब्लॉक निहाय पहिल्या ५० थकबाकीदारांची यादी जाहीर करानवीन मालमत्तांची कर आकारणी २५ डिसेंबर पर्यंत करा

ठाणे - मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी रूपयांची वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. दरम्यान प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याचबरोबरच वेळप्रसंगी कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
                       मंगळवारी झालेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना आयुक्तांनी मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीचा आढावा घेतानाच डिसेंबर अखेर वसुली उद्दीष्टाच्या ८४ टक्के म्हणजेच जवळपास ५०० कोटी रूपये वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे सक्त निर्देश दिले. मंगळवारी अखेर अंदाजे ३०२ कोटी मालमत्ता कराच्या स्वरूपात वसुली झाली आहे. सदरची वसुली ही निर्धारित उद्दीष्टाच्या ५० टक्केपेक्षा जास्त झाली आहे. जवळपास ४.७५ लक्ष मालमत्ता कराची देयके वितरित करण्यात आली असून त्यापैकी जवळपास २.६६ लक्ष ग्राहकांनी आपला मालमत्ता कर भरला आहे. उर्वरीत २.०९ लक्ष लोकांनी आपला मालमत्ता कर भरावा यासाठी प्रभाग समिती निहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
                 त्याचप्रमाणे ब्लॉकनिहाय पहिल्या ५० थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राध्यान्य देण्याच्या सूचना देतानाच पहिल्या सहामाहीमधील थकबाकीदारांकडील वसुली करण्यावर भर देण्याबाबतही आयुक्तांनी सांगितले. दरम्यान अस्तित्वातील मालमत्तांची वसुली करण्याबरोबरच नवीन मालमत्तांची कर आकारणी २५ डिसेंबर पर्यंत करून तसे प्रमाणपत्र संबंधित कर निरीक्षकांनी सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्याचबरोबर वापरात बदल किंवा अनिवासी भाडेतत्वावरील कर आकारणीची कार्यवाहीही २५ डिसेंबर अखेर करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. पाणी पट्टी वसुलीबाबत बोलताना आयुक्तांनी प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता यांनी एकित्रतपणे डिसेंबर अखेर ८० टक्के वसुली करण्याच्या सूचना दिल्या.



 

Web Title: Nashik Municipal Corporation has given 500 crore property tax recovery by December end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.