भार्इंदरच्या मंडईतून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 05:34 AM2018-12-31T05:34:56+5:302018-12-31T05:35:17+5:30

येथील मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवारच्या आठवडाबाजारातून नाशिकच्या शेतकºयांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा-भार्इंदरमध्ये घडला आहे.

 Nasik farmers from Bharindar Mandi grabbed the farmers | भार्इंदरच्या मंडईतून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावले

भार्इंदरच्या मंडईतून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावले

Next

भार्इंदर : येथील मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवारच्या आठवडाबाजारातून नाशिकच्या शेतकºयांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा-भार्इंदरमध्ये घडला आहे. येथील हॉलमध्ये मंडप-डेकोरेशनचे काम घेणाºया भाजपा नगरसेवकाच्या सांगण्यावरून मंडईच्या दारास टाळे ठोकल्याचा आरोप आहे. त्यामुळे मध्यरात्री दीड वाजतापासून भरथंडीत कुडकुडत रस्त्यावर राहावे लागलेल्या शेतकºयांना रविवारी सकाळी आपला बाजारसुद्धा रस्त्यावरच मांडावा लागला.
शेतकºयांच्या मालास भाव मिळावा, अडत्यांच्या कात्रीतून सुटका होऊन त्यांना थेट बाजारपेठेत फळे-भाजीपाला विकता यावा, तसेच नागरिकांनासुद्धा याचा फायदा व्हावा, म्हणून राज्य शासनाने संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडाबाजार भरवण्याची योजना अमलात आणली. राज्याच्या कृषी पणन महामंडळानेदेखील त्यासाठी पालिकेला कळवले. तत्कालीन महापौर गीता जैन यांच्या आग्रही मागणीनंतर पालिकेने भार्इंदर पश्चिम येथील अमृतवाणी मार्गावरील मार्केटचे आरक्षण क्र.-९७ आणि इंद्रलोक भागातील मीनाताई ठाकरे मंडई आरक्षण क्रमांक-२३१ मधील जागा शेतकºयांच्या आठवडाबाजारासाठी उपलब्ध करून दिली. तसे पत्र पालिकेने पणन मंडळास दिले.
मंडईच्या आवारात १३ महिन्यांपासून दररविवारी शेतकरी आठवडाबाजार भरतो. नाशिकवरून येणारे ३० ते ३५ शेतकरी आपला भाजीपाला आदी येथे विक्रीसाठी टेम्पोने घेऊन येतात. यात काही
महिला शेतकºयांचासुद्धा समावेश आहे.
थेट ग्राहकांना भाजीपाला विकल्याने शेतकºयांना भाव मिळतो. शिवाय, ग्राहकांना थेट शेतातील भाजीपाला माफक दरात मिळत असल्याने हा आठवडाबाजार लोकांच्या पसंतीस उतरला आहे.
दरम्यान, ठाकरे मंडईमध्ये पालिकेने खाली मंडई आणि वर हॉल असे बांधकाम केले असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी होळीच्यावेळी केले होते. आता पालिकेने हा हॉल गोल्डन पेटल नावाच्या कंत्राटदारास भाड्याने दिला आहे. गोल्डन पेटलचे नाव असले, तरी यामागे भाजपा नगरसेवक राकेश शाह हे असल्याची चर्चा आहे.
शाह यांनी मंडईच्या आवारात भरणारा आठवडाबाजार बंद करण्यास शेतकºयांना सांगितल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास नाशिकचे शेतकरी भाजीपाला घेऊन आले असता, मंडईचे प्रवेशद्वार त्यांच्यासाठी बंद करण्यात आले. शाह यांनी तुम्हाला आत घ्यायचे नाही, असे सांगितले असून तुमची व्यवस्था तुम्ही करा, असे त्यांना रखवालदारांमार्फत बजावण्यात आले.
पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याकडे तक्रार केल्यावर मंडईचे प्रवेशद्वार खुले केले गेले. परंतु, आधीच रस्त्यावर बाजार सुरू केल्याने शेतकरी आत गेले नाही.
दरम्यान, शहरातील भाजपा नेत्यांना शेतकरी नको आहेत. त्यांना त्यांचा धंदा व उद्योगपती हवे आहेत. बेकायदा फेरीवाल्यांना आश्रय देतात. आठवडाबाजार बंद केला, तर आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी दिली.

रात्री १ च्या सुमारास नाशिकवरून आलो असता मंडईच्या आत गाडी नेण्यास मनाई केली. यापुढे गाडी आत लावायची नाही. तुमचे तुम्ही बघा, असे सांगण्यात आले. आणलेला भाजीपाला परत कसा न्यायचा? नुकसान होईल, म्हणून नाइलाजाने रस्त्यावरच थांबलो व सकाळी भाजीपाला विक्रीसाठी ठेवला.
- राजेश बाळासाहेब आव्हाड, शेतकरी

मी ठाकरे हॉल भाड्याने घेतला नसून या प्रकाराशी माझा काहीच संबंध नाही. माझा आधीपासून मंडप- डेकोरेशनचा व्यवसाय असून या हॉलमध्ये ठेकेदाराच्या आॅर्डरवरून माझे केवळ मंडप-डेकोरेशनचे काम चालते.
- राकेश शाह, भाजपा नगरसेवक

शेतकºयांच्या हक्कासाठी आठवडाबाजारास पालिकेने जागा द्यावी, म्हणून आपण प्रयत्न केले होते. त्यांना हुसकावून लावणे म्हणजे समस्त शेतकºयांचा अपमान आहे. भाजीपाला मंडईमध्ये विकायचा नाही, तर कुठे विकायचा?
- गीता जैन, माजी महापौर, भाजपा

मोदी आणि फडणवीसांच्या राज्यात शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या, पीक विम्यात घोटाळा आदींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच, आता पालिकेतील सत्ताधारी भाजपाने शेतकºयांचे कडाक्याच्या थंडीत अमानवी हाल करून त्यांना मंडईतून हुसकावून लावणे निंदनीय आहे.
- शैलेश पांडे, प्रवक्ते, शिवसेना

Web Title:  Nasik farmers from Bharindar Mandi grabbed the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.