रोटरी क्लब ऑफ ठाणे मेट्रोकडून २६ शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:48 AM2021-09-07T04:48:32+5:302021-09-07T04:48:32+5:30
ठाणे : शिक्षकांच्या कार्याचा राष्ट्राच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा आहे. शिक्षकांच्या या कार्याची दखल घेऊन येथील रोटरी इंडिया लिटरसी मिशन ...
ठाणे : शिक्षकांच्या कार्याचा राष्ट्राच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा आहे. शिक्षकांच्या या कार्याची दखल घेऊन येथील रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गंत रोटरी क्लब ऑफ ठाणे मेट्रोने शहरातील २६ शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्डने गौरवून शिक्षक दिन साजरा केला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लबने शहर परिसरातील २६ शिक्षकांची नेशन बिल्डर अवॉर्डसाठी निवड करून त्यांना सन्मानित केले आहे. यामध्ये प्राथमिक शाळेतील १३ व माध्यमिक शाळेतील १३ अशा एकूण २६ शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे रोटरी क्लब ऑफ ठाणे मेट्रोचे अध्यक्ष रोटरीयन गणेश लखोडे, सामाजिक उपक्रमाच्या संचालक रोटरीयन डॉ. अम्रिता कोळी यांनी सांगितले. येथील सहयोग मंदिर हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यासाठी प्रमुख पाहुणे ॲव्हेन्यू चेअर-टीचर - सपोर्ट व गेस्ट ऑफ ऑनर रोटरियन विनया हैबर, सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा - मंडळ, मुंबई विभागीय कार्यालय सचिव राजेंद्र अहिरे, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी टीईएसीएचविषयी रोटरियन चंद्रशेखर बेंद्रे यांनी माहिती दिली. यानंतर बदलेली शिक्षणाची पद्धत व शिक्षकांची जबाबदारी याबाबत विस्तृत मार्गदर्शन अहिरे यांनी केले. हैबर यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे योगदान याविषयी मत मांडले. यावेळी पुरस्कारप्राप्त काही शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डिस्ट्रिक ३१४२ चे असिस्टंट रोटरीयन राजेंद्र शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे महाबळेश्वर नाईक, मावळी मंडळचे उपाध्यक्ष सुधाकर मोरे, विद्या प्रसारक अनगावचे ट्रस्टी लेले, आदी उपस्थित होते.
---