राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफ हिला उपविभागीय अधिकारी यांनी दिली तहसीलदार कार्यालयात हंगामी नोकरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 07:30 PM2021-06-02T19:30:39+5:302021-06-02T19:31:19+5:30

- नितिन पंडीत भिवंडी : शहापूर तालुक्यातील हाली बरफ या महिलेच्या आयुष्यात शौर्य पुरस्कार पटकाविल्या नंतर ही अठराविश्व दारिद्र्य व ...

National Bravery Award winner Hali Baraf was given a temporary job in the Tehsildar's office | राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफ हिला उपविभागीय अधिकारी यांनी दिली तहसीलदार कार्यालयात हंगामी नोकरी 

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफ हिला उपविभागीय अधिकारी यांनी दिली तहसीलदार कार्यालयात हंगामी नोकरी 

googlenewsNext

- नितिन पंडीत

भिवंडी: शहापूर तालुक्यातील हाली बरफ या महिलेच्या आयुष्यात शौर्य पुरस्कार पटकाविल्या नंतर ही अठराविश्व दारिद्र्य व अंधार काही संपला नव्हता. लॉकडाऊन मुळे हंगामी स्वरूपात आश्रमशाळेत मिळालेली नोकरी आश्रमशाळा बंद असल्याने तीही बंद झाली. तर शिधावाटप पत्रिकेची ऑनलाईन नोंद नसल्याने तीन महिने धान्य सुध्दा न मिळाल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली असताना त्या संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्याने त्याची दखल घेत भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी घेत तीस तहसीलदार कार्यालय शहापूर येथे तीन महिन्यांच्या हंगामी शिपाई पदावर तिची नियुक्ती करण्यात आली असून  बुधवारी हली बरफ हिस भिवंडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बोलावून नियुक्तीपत्र देऊन तिचा सन्मान केला. त्यासोबतच पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून तिच्या शिधा पत्रिकेची ऑनलाईन नोंदणी होत नाही तोपर्यंत तिला ऑफलाईन धान्य देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिले आहेत .

कातकरी या आदिम आदिवासी जमात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजातील हाली बरफ हिने १२ वर्षांची असताना जंगलात लाकूडफाटा घेण्यासाठी गेली असता वाघाने केलेल्या हल्ल्यातून आपल्या बहिणीचे प्राण वाचविले होते त्याचा सन्मान राष्ट्रीय पातळीवर २०१२ मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन करण्यात आला होता . परंतु त्यानंतर अशिक्षित असलेल्या हाली कडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी सतत दुर्लक्ष केल्याने तिला आपल्या आयुष्यासाठी झगडावे लागले .त्यातून तिला अंत्योदय शिधापत्रिका , घरकुल देण्यात आले तर उदरनिर्वाहासाठी आदिवासी प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेत शिपाई पदावर हंगामी नेमणूक करून तिला मदत केली होती .

परंतु लॉकडाऊन मध्ये आश्रमशाळा मागील एक वर्षांपासून बंद असल्याने तेथील नोकरी तिने गमावली होती त्यामुळे तिच्यावर पुन्हा एकदा दारिद्र्याचे जीवन जगण्याची वेळ आली होती यावर उपाय म्हणून ही तीन महिन्यांची हंगामी नोकरी तिला उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांच्या प्रयत्नातून मिळाल्याने हाली बरफ हिने समाधान व्यक्त केले आहे .समाजातील प्रत्येक घटकाला मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून हाली बरफ हिच्या वाट्याला आलेल्या आयुष्याची माहिती कळताच आपण तिला हंगामी नोकरी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिली आहे .

Web Title: National Bravery Award winner Hali Baraf was given a temporary job in the Tehsildar's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.