राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने घेतली पोलिस, मुख्याध्यापकांची ‘शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 05:42 AM2024-08-24T05:42:50+5:302024-08-24T05:42:57+5:30

अत्याचाराच्या घटनेचा अहवाल केंद्राकडे सोपवणार

National Commission for Child Rights took over the 'inquiry' of police, principal | राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने घेतली पोलिस, मुख्याध्यापकांची ‘शाळा’

राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने घेतली पोलिस, मुख्याध्यापकांची ‘शाळा’

बदलापूर : बदलापुरातील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिवांची नेमणूक केली आहे. आयोगाच्या सदस्य सचिवांनी शुक्रवारी तब्बल पाच तास तपासयंत्रणा आणि शाळा प्रशासनाची ‘शाळा’ घेतली. अत्याचाराच्या या घटनेचा अहवाल केंद्राकडे सोपवला जाणार आहे. 

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिव रुपाली बॅनर्जी सिंग या बदलापूरमध्ये दाखल झाल्या आहेत. सिंग यांनी पालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात चौकशीसाठी सर्व विभागांना बोलावले होते. सुरुवातीला पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पोलिसांनी नेमकी कोणती भूमिका बजावली याचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिस कोणत्या दिशेने तपास करीत आहेत, याची माहिती घेतली. नंतर इतर विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. 

वैद्यकीय पथकासोबतही केली सविस्तर चर्चा 
ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि मदतनीस यांच्याकडून घडलेल्या प्रकाराबाबत तसेच नेमकी चूक कुठे झाली, याचाही त्यांनी आढावा घेतला. मुलींची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या वैद्यकीय पथकासोबतही त्यांनी सविस्तर चर्चा केली. संस्थाचालकांसोबत बैठक घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती आयोग घेणार होता. मात्र, संस्थाचालकांवर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच सर्व संस्थाचालकांनी तिथून पळ काढला. त्यामुळे बॅनर्जी यांना संस्थाचालकांकडून कोणतीही माहिती मिळाली नाही.

Web Title: National Commission for Child Rights took over the 'inquiry' of police, principal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.