तलावसंवर्धनावर राष्ट्रीय परिषद
By admin | Published: February 14, 2017 02:49 AM2017-02-14T02:49:20+5:302017-02-14T02:49:20+5:30
शहरातील बी.एन.एन. महाविद्यालयाचा प्राणिशास्त्र विभाग, भारतीय जल जीवशास्त्रज्ञ संस्था, हैदराबाद आणि नौशाद अली सरोवर
भिवंडी : शहरातील बी.एन.एन. महाविद्यालयाचा प्राणिशास्त्र विभाग, भारतीय जल जीवशास्त्रज्ञ संस्था, हैदराबाद आणि नौशाद अली सरोवर संवर्धिनी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एन.एन. महाविद्यालयात नैसर्गिक जलस्रोत, तलावसंवर्धन आणि व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. येत्या शनिवार, १८ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान ही परिषद होणार आहे.
पाण्याचे नैसर्गिक स्रोत असलेले तलाव, नद्या व पाणथळ जागा यांना जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाढते औद्योगिकीकरण, जागतिक औष्मीकरण व रासायनिक खतांचा वापर यामुळे जलस्रोतांचा हळूहळू ऱ्हास होतो आहे. भविष्यात पाण्याची समस्या गंभीर होण्यापूर्वी नैसर्गिक स्रोताचे नियोजन झाले पाहिजे. त्याचबरोबर, शासनाच्या संबंधित विभागाकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही नैसर्गिक स्रोतांच्या पाण्याचे नियोजन होताना दिसत नाही. या राष्ट्रीय परिषदेत सिक्कीम, गोवा, अनंतपूर, आंध्र प्रदेश, हैदराबाद, रांची, झारखंड या विविध राज्यांतील जलतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे देखील उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)