पर्यावरणाचे कायदेशीर संरक्षणावर ठाणे काँलेजात राष्ट्रीय परिसंवाद !
By सुरेश लोखंडे | Published: February 25, 2024 06:57 PM2024-02-25T18:57:05+5:302024-02-25T18:57:24+5:30
यावेळी विद्यार्थ्यांनसह, प्राध्यापक व आलेल्या उत्तम प्रतिसाद दिला.
ठाणे : येथील व्हीपीएमएस लॉ कॉलेज व बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालयाने ‘पर्यावरणाचे कायदेशीर संरक्षण आणि सुधारणा: आव्हाने आणि पुढील मार्ग’ हा राष्ट्रीय परिसंवाद आज आयाेजित केला असता त्यात आलेल्या तज्ञांनी पाहुण्यांनी उत्तम मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनसह, प्राध्यापक व आलेल्या उत्तम प्रतिसाद दिला.
विद्या प्रसारक मंडळाचे टीएमसी विधी महाविद्यालय, बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालय व पॉलिटेक्निक महाविद्यालय यांनी संयुक्तपणे हा परिसंवाद आयोजित केला होता. मुबंई उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित अधिकरण चे माजी न्यायमूर्ती यु. डी. साळवी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय हरित अधिकरण चे एक्सपर्ट सदस्यांनी सखाेल मार्गदर्शन केले. यावेळी विप्रमंचे कार्यकारी सदस्य डॉ. महेश बेडेकर, माजी प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर आणि तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीविद्या जया कुमार, डॉ. डि के नायक आणि डॉ. विंदा मांजरमकर उद्घाटनप्रसंगी सत्रासाठी उपस्थित होते.
यावेळी साळवी यांनी उद्घाटन पर भाषण स्पष्ट केले की, पर्यावरण कसे संतुलित असले पाहिजे व यासाठी असलेला कायद्यावर त्यांनी भाष्य केले. डॉ. कुलकर्णी यांनी बोलताना, पर्यावरण हा विषय कसा प्रत्येक अभ्यास शाखेशी जोडला गेलेला आहे याचे विवेचन सांगितले. दुसरे सत्र हे राष्ट्रीय हरित अधिकरणाच्या एकुण कायदा, अधिकार पध्दती, खटले व प्रक्रिया या विषयावर होते.
यावर भाष्य करण्यासाठी पाच अधिवक्त्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये रघुनाथ महाबल, अनिरुद्ध कुलकर्णी, मानसी जोशी व सुप्रिया डांगरे, सौरभ कुलकर्णी यांनी सहभाग घेवुन अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत. दुपारच्या जेवणानंतर तिसरे सत्र घेण्यात आले. यापुर्वी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी नितीन वाघ यांनी त्यांच्या शोध पेपर सादर केला. डॉ. अजय देशपांडे यांचेही यावेळ व्याख्यान झाले.