भिवंडी महापालिकेची राष्ट्रीय एकता दौड संपन्न ; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्द प्रतिसाद 

By नितीन पंडित | Published: October 31, 2022 06:44 PM2022-10-31T18:44:23+5:302022-10-31T18:44:50+5:30

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केली जात असताना या जयंती निमित्त भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

National unity race of Bhiwandi Municipal Corporation completed; Enthusiastic response from citizens including students | भिवंडी महापालिकेची राष्ट्रीय एकता दौड संपन्न ; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्द प्रतिसाद 

भिवंडी महापालिकेची राष्ट्रीय एकता दौड संपन्न ; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्द प्रतिसाद 

Next

भिवंडी :दि.३१- 

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केली जात असताना या जयंती निमित्त भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली एकता दौड वंजारपट्टी नाका ,एसटी डेपो येथून भिवंडी महानगरपालिका मुख्यालय येथे दाखल झाली.

राष्ट्रीय एकता वृंदिगत व्हावी या उद्देशाने या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते, देशवासीयांनी आपल्या देशाची एकता टिकवण्याचा संकल्प करावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी यावेळी केले.यानंतर आयुक्त यांचे शुभहस्ते स्वर्गीय इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करण्यात आला.तर आयजीएम हॉस्पिटल येथील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रसंगी उपायुक्त मुख्यालय दीपक पुजारी,अभियंता एल पी गायकवाड,उपायुक्त नूतन खाडे ,सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे,नितीन पाटील ,मनपा प्रभाग अधिकारी व,विविध शाळांमधील विद्यार्थी, कर्मचारी सहभागी झाले  होते.

यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून राष्ट्राची एकता अखंडता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्याची शपथ घेतली.

Web Title: National unity race of Bhiwandi Municipal Corporation completed; Enthusiastic response from citizens including students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.