कचरा घोटाळ्याची राष्ट्रवादीने केली अॅन्टीकरप्शनकडे तक्रार, चौकशी करुन कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 03:42 PM2018-11-29T15:42:22+5:302018-11-29T15:44:00+5:30
कचऱ्याच्या निमित्ताने ठाणे महापालिकेत सुरु असलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसने अॅन्टीकरप्शन विभागाकडे केली आहे. यामध्ये दोषी असलेल्यांची चौकशी करुन कारवाईची मागणीसुध्दा करण्यात आली आहे.
ठाणे - ठाणे महानगर पालिकेच्या वतीने एम कुमार आणि ईट्टपल्ले या दोन ठेकेदारांना घंटागाडीचे कंत्राट देण्यात आले आहे. या कत्राटदाराकडून कामगारांची पिळवणूक केली जात आहे. तसेच कचऱ्याच्या मोजमापात या ठेकेदारांकडून भ्रष्ठाचार केला जात आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे एका तक्र ार अर्जाद्वारे केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला दिलेल्या तक्र ार अर्जानुसार, ठामपाने ठकेदारी तत्वावर इटापल्ले आणि एम. कुमार यांना घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचा ठेका दिला आहे. यापैकी इटापल्ले नावाच्या एका ठेकेदाराला वडोदरा आणि नांदेडमधून काळ्यायादीत टाकण्यात आलेले आहेत. तरीही गेली तीन वर्षे त्यालाच टेंडर देण्यात आलेले आहेत. कचऱ्याच्या बाबतीत काही मानके जारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. २००२ मध्ये दर माणशी ६२५ ग्रॅमचा ओला-सुका कचरा निर्माण होत असल्याचा दावा ठामपाने केला होता. त्यानुसार ७५० मेट्रीक टन कचरा तयार होत असल्याचे सांगितले जात होते. आता लोकसंख्या वाढल्यानंतरही तेवढाच कचरा गोळा होत असल्याचा दावा केला जात असेल तर तेव्हापासूनच या कचºयामध्ये भ्रष्टाचार होत आहे. एम कुमार या ठेकेदाराने आपणाकडे ४०० कर्मचारी काम करीत आहेत, असे दाखवले आहे. मात्र, प्रत्यक्ष ३०० लोकच त्याच्याकडे काम करीत आहेत. एका कामगाराला १९ हजार रु पये वेतन दिले जात आहे. या प्रमाणे सुमारे १९ लाख रु पये हा ठेकेदार हडप करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. घंटागाडीच्या फेºयांमध्येही अपहार सुरु असल्याचा दावा पाटील आणि परांजपे यांनी केला आहे.
घनकचरा विभागामार्फत सफाई कामगारांना कपडे, छत्री, रेनकोट, गमबूट आदी साहित्यांचे वाटप करण्यात येत असते. मात्र, हे साहित्य सलग तीनवर्षे दोन्हीही ठेकेदांनी दिलेच नसल्याने वर्षाकाठी सुमारे २४ लाख रु पयांचा अपहार झाला आहे. घंटागाडी कर्मचाºयांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कमच जमा केलेली नाही. ही रक्कम सुमारे ६ कोटी ४४ लाख रु पये एवढी आहे.
कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी तो एकत्रितपणेच डम्पींगवर टाकला जात आहे. सीपी तलाव येथील कचरा संकलन तथा वर्गीकरण केंद्रात असलेल्या नोंदपुस्तीका पडताळल्यास घंटागाडींच्या फेºया, कचरा वजन यामध्ये केलेला फेरफार तसेच घोटाळा उघडकीस येऊ शकतो. एकूणच पाहता, हे ठेकेदार जनतेच्या कररु पी पैशाचा ( सार्वजनिक मालमत्ता) अपहार करीत आहेत. हा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या तिसऱ्या प्रकरणातील ७ व्या कलमातील पोटकलम क, ख, व आणि ड अन्वये शिक्षेस पात्र ठरु शकतो. तरी, आपण या पत्राची गांभीयाने दखल घेऊन दोन्ही ठेकेदार, या ठेकेदारांशी संबधीत असलेल्या घनकचरा खात्यातील अधिकारी , यांच्या ज्ञात- अज्ञात; नातेवाईकांच्या नावावर असलेल्या संपत्तीची चौकशी करु न संबधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.