ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने घातले नोटाबंदीचे श्राद्ध, भाजपच्या नीतीविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 02:03 PM2017-11-08T14:03:56+5:302017-11-08T14:08:38+5:30
ठाणे - मोदी सरकारने नोटाबंदी करुन १ वर्षाचा कालावधी सरला आहे. मात्र, या एका वर्षानंतरही भारतीय अर्थव्यवस्था कोमातून बाहेर आलेली नाही, असा आरोप करीत आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदीचे विधिवत श्राद्ध घातले. दरम्यान, नोटाबंदीमुळे या देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली असून त्याविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस आपला लढा अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी आनंद परांजपे यांनी दिला.
मागील वर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक १ हजार आणि ५०० रु पयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून या देशातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून ती एक वर्षानंतरही सावरलेली नाही. त्याच निषेधार्थ तसेच नोटाबंदीच्या या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी होळकर घाटावर नोटाबंदीचे वर्षश्राद्ध ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घालण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक प्रकाश बर्डे, सुहास देसाई, राजन किणी, शानू पठाण, वहिदा खान, अनिता शिंदे, आरती गायकवाड, अपर्णा साळवी, मोरेश्वर किणी, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मंदार किणे, राष्ट्रवादीचे विद्यार्थी अध्यक्ष अभिजीत पवार, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा करिना दयालानी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत मुंडणही केले.
यावेळी परांजपे म्हणाले की, मागील वर्षी मोदी सरकारने भारतीय जनतेवर नोटाबंदी लादली होती. तेव्हापासून या देशात आर्थिक अराजकता माजली आहे. या नोटा बदलण्याच्या रांगेत उभे राहणारे शंभरपेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. नवीन रोजगार निर्मिती ठप्प झालेली असतानाच १५ लाख जणांच्या नोकºया गेल्या आहेत. देशाचा विकासदर ७.१ वरु न ५.७ घसरला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार असणाºया मोदी यांच्या हुकूमशाही धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रखर लढा उभारणार आहे.
चौकट
आंदोलनानंतर दिसली मानवता
नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घातल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अन्नदान केले. ब्राम्हणाच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात पिंडदान करण्यात आले. त्यानंतर या परिसरात असणाऱ्या गरीब आणि लहान बालकांना अन्नदान करण्यात आले. सुमारे ५० जणांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेवण दिले.