गॅस दरवाढ विरोधात भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकारचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 03:34 PM2021-02-06T15:34:09+5:302021-02-06T15:34:15+5:30
शेणी गौऱ्या जाळून चुलीवर जेवण बनवून केला मोदी सरकारचा निषेध
- नितिन पंडीत
भिवंडी: गॅस दरवाढ रोखण्यात केंद्र शासनाला पुरता अपयश आले असून दिवसेंदिवस घरगुती गॅस दरांमध्ये हॉबणाऱ्या दरवाढी विरोधात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्याभिवंडी शहर महिला अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जकात नाका येथील धर्मवीर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी चक्क चुलीवर जेवण बनून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा तीव्र निषेध केला . चुलीवर शेणी गौऱ्या जाळून यावेळी अंदोलनकर्त्या महिलांनी चुलीवर भाकऱ्या भाजल्या तसेच कांदा पोहा बनून उपस्थित आंदोलनकर्त्यांना हे चुलीवर बनवलेले गरमागरम जेवण खाऊ घातले .
एकीकडे महिलांना चुलीच्या धुराचा त्रास होतो म्हणून पंतप्रधांनाही महिलांना गॅस देण्याचा बनाव केला . घराघरात गॅस दिली मात्र आता गॅसची दरवाढ होत असल्याने महिलांना गॅस सिलेंडर घेणे परवडणारे नसल्याने पुन्हा केंद्र सरकार महिलांना चुलीवर जेवण बनविण्यास भाग पडणार असल्याने फसव्या मोदी सरकारच्या गॅस दर वाढी विरोधात आज हे चुलीवर भाकरी भाजो आंदोलन करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दिली आहे . त्यातच देशात दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढू लागलाय, केंद्र सरकारचे यावर कोणतेच नियंत्रण नाही. सिलेंडरच्या दरात देखील वाढ होत असल्याने महिलांचं किचनमधील बजेट कोलमडल आहे.
महिलांवर येत्या दिवसात चुलीवर जेवण बनवण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यातच भाजपचे अच्छे दिन कुठे दिसलेच नाही मात्र बुरे दिनाची सुरवात आता पासून सुरु झाली असून आम्हाला आमचे जुने दिवसच पुन्हा आना तुमच्या फसव्या अच्छेदिनच्या बाटवण्या बंद करा अशा घोषणा यादरम्यान महिलांनी दिल्या . या आंदोलनाप्रसंगी भाजप सरकार विरोधात महिलांनी प्रचंड रोष व्यक्त करत आंदोलना दरम्यान बनवण्यात आलेल्या चुलीवरच्या जेवणाचा अस्वाद देखील कार्यकर्त्यांनी घेतला.
तर भाजपच्या या धोरणामुळे नागरिकांचे वाईट दिवस सुरु झाले असून येत्या काही दिवसात भीक मागण्याची वेळ येणार असून वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले असून आता आम्हाला मोदी सरकार पुन्हा अश्मयुगात नेणार का असा सवाल देखील शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी उपस्थित केला . या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यकर्ता जावेद फारुखी यांच्यासह महाला व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते .