इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची ठाण्यात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 10:12 PM2021-02-28T22:12:12+5:302021-02-28T22:13:36+5:30
केंद्र सरकारने इंधनाच्या तसेच घरगुती सिलिंडरच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. ही दरवाढ सातत्याने केली जात आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ पाचपाखाडी येथील शेल पेट्रोल पंपाच्या बाहेर राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने रविवारी निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: केंद्र सरकारने इंधनाच्या तसेच घरगुती सिलिंडरच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. ही दरवाढ सातत्याने केली जात आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ पाचपाखाडी येथील शेल पेट्रोल पंपाच्या बाहेर राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने रविवारी निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला.
राष्टÑवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि महिला अध्यक्ष सुजाता घाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोल पंपासमोरच ही निदर्शने करण्यात आली. यावेळी सुरेखा पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या दोन महिन्यामध्ये सिलिंडरच्या दरात साधारणपणे शंभर
रु पयांची दरवाढ झाली. त्यामुळे आता महिलांवर चूल पेटविण्याची वेळ आली आहे. पण, ही दरवाढ मागे न घेतल्यास केंद्र सरकारलाच आम्ही चूलीवर बसवू. या दरवाढीच्या निषेधातील हे आंदोलन यापुढे दिल्लीत जाऊन करु आणि केंद्र सरकारला धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनामध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्षा फुलबानो पटेल , कळवा अध्यक्षा साबिया मेमन , प्रदेश प्रतिनिधी ज्योती निम्बर्गी, शशीकला पुजारी, कल्पना नार्वेकर आदी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.