कल्याण, ठाणे, भार्इंदरदरम्यान होणार जलवाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:47 AM2017-08-01T02:47:54+5:302017-08-01T02:47:56+5:30

ठाणे खाडीचा वापर करून जलवाहतूक सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली.

Navigation between Kalyan, Thane and Bhinder | कल्याण, ठाणे, भार्इंदरदरम्यान होणार जलवाहतूक

कल्याण, ठाणे, भार्इंदरदरम्यान होणार जलवाहतूक

googlenewsNext

ठाणे : ठाणे खाडीचा वापर करून जलवाहतूक सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-मुंबई-भार्इंदर अशी जलवाहतूक सुरू करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली.
खासदार राजन विचारे यांच्यासह कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत गडकरी यांच्यासमोर या प्रकल्पाची व्यवहार्यता तसेच प्राथमिक सविस्तर प्रकल्प अहवालाचे सादरीकरण सोमवारी करण्यात आले. त्यानंतर गडकरी यांनी मदतीचा हात पुढे करत या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ४५३ कोटीपैकी ५० टक्के वाटा उचलण्यास मान्यता दिली.
ठाणे आणि त्यापुढील रहिवाशांना किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक सुरू व्हावी, या दृष्टीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्याला मंजुरी मिळावी, यासाठी शिंदे आणि विचारे यांनी दिल्लीत सातत्याने पाठपुरावा केला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त जयस्वाल यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेऊन व्यवहार्यता अहवाल आणि प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार केला. त्याचे सादरीकरण सोमवारी गडकरी यांच्यासमोर केले. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई-मीरा भार्इंदर हा जलमार्ग विकसित करण्यात येणार असून त्यासाठी ४५३ कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, काल्हेर, कोलशेत, नागला बंदर, घोडबंदर रोड, मीरा-भार्इंदर, वसई किल्ला या ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. गडकरी यांनी ठाणे महापालिकेला अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे निर्देश देताना प्रकल्पातील खर्चाचा ५० टक्के वाटा उचलण्यास तयारी दर्शविली.

Web Title: Navigation between Kalyan, Thane and Bhinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.