तुर्फेपाडा तलावाला मिळणार नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:06 PM2019-06-10T23:06:37+5:302019-06-10T23:07:10+5:30
बंधाऱ्याचे काम सुरू : पाणीसाठा वाढवण्याचे प्रयत्न
ठाणे : घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड संकुलानजीकच्या तुर्फेपाडा तलावाचा आता कायापालट होणार असून त्यासाठी आता पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार, येथे गॅबियन पद्धतीचा बंधारा उभारण्याचे काम सुरू असून त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
शहरात आजघडीला ३४ तलाव शिल्लक असून त्यातील मोजके तलाव सोडले, तर इतरांची अवस्था दयनीय झाली आहे. या तलावांच्या अवस्थेबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर, आता कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या तुर्फेपाडा तलावाचा कायापालट करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. यासाठी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पत्रव्यवहारही केला होता. त्या अनुषंगाने आता या तलावाचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
गॅबियन पद्धतीचा बंधारा बांधण्यास सुरुवात
सुशोभीकरणाबरोबरच तलावात पाण्याचा मोठा साठा झाल्यास परिसरातील बोअरिंगला बाराही महिने पाणी मिळू शकेल, हे लक्षात घेऊन नगरसेवक डुंबरे यांनी महापालिका प्रशासनाकडे तलावाभोवती गॅबियन पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी केली होती. त्याला आता यश आले असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बंधाऱ्यांच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यानुसार, आता बंधाºयाचे काम सुरू झाले आहे. या बंधाºयामुळे यंदाच्या पावसाळ्यात तुर्फेपाडा परिसरात पाण्याचा मोठा साठा उपलब्ध होईल, अशी माहिती पालिकेने दिली.