सेनेच्या अजेंड्यावर नेवाळी, उद्धव ठाकरेंशी चर्चा : वाचला अत्याचाराचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:30 AM2017-12-18T01:30:17+5:302017-12-18T01:30:26+5:30

नेवाळीतील शेतक-यांचे आंदोलन पोलीसी बळाच्या वापरातून ज्यापद्धतीन९ दडपले गेले, त्याबद्दल गावकºयांच्या मनात अजूनही चीड आहे. हा विषय आता शिवसेनेने हाती घ्यावा, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.

 Navneeti talks with Uddhav Thackeray | सेनेच्या अजेंड्यावर नेवाळी, उद्धव ठाकरेंशी चर्चा : वाचला अत्याचाराचा पाढा

सेनेच्या अजेंड्यावर नेवाळी, उद्धव ठाकरेंशी चर्चा : वाचला अत्याचाराचा पाढा

Next

कल्याण : नेवाळीतील शेतक-यांचे आंदोलन पोलीसी बळाच्या वापरातून ज्यापद्धतीन९ दडपले गेले, त्याबद्दल गावकºयांच्या मनात अजूनही चीड आहे. हा विषय आता शिवसेनेने हाती घ्यावा, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.
ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांनी शनिवारी ठाकरे यांची भेट घेतली. अंबरनाथ पंचायत समितीत नेवाळी गणातून नेवाळी ग्रामपंचायतीचे सरपंच चैनू जाधव यांच्या पत्नी, शिवसेनापुरस्कृत उमेदवार तेजश्री जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी नेवाळीत शेतकºयांवर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.
धावपट्टीसाठी घेतलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवरून शेतकºयांनी जून महिन्यात छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी टायर, वाहने पेटवून देत काटईनाका-बदलापूर रस्त्यावरील वाहतूक सहा तास रोखून धरली होती. यावेळच्या दगडफेकीत पोलिसांसह २६ जण जखमी झाले होते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी छºर्याच्या बंदुकीचा वापर करत गोळीबार केला. त्यात शेतकरी जखमी झाले होते. नंतर वेगवेगळ्या गावातील शेतकºयांचे अटकसत्र राबवण्यात आले. संघर्ष समितीने वारंवार संरक्षणमंत्री, जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. पण कोणताही निर्णय न झाल्याने शेतकरी आक्र मक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसी अत्याचाराला नेवाळीतला शेतकरी बळी पडला आहे. इतके होऊनही आता निवडणुका झाल्यानंतर शेतकºयांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. नेवाळी परिसरातील शेतकºयांच्या जमिनी बळकावणे म्हणजेच सरकारने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेण्यासारखे आहे. या परिसरातील शेतकºयांच्या समस्या कमी न होता वाढत चालल्याची स्थानिकांची भावना आहे. चैनू जाधव यांनी याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. यावेळी जाधव यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेही उपस्थित होते.
संपूर्ण ताकदीने शेतकºयांच्या पाठीशी-
कोणताही निर्णय न झाल्याने नेवाळीतील शेतकरी आक्र मक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसी अत्याचाराला नेवाळीतला शेतकरी बळी पडला आहे.
आता निवडणुका झाल्यानंतरही शेतकºयांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. नेवाळी परिसरातील शेतकºयांच्या जमिनी बळकावणे म्हणजेच सरकारने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेण्यासारखे आहे. या परिसरातील शेतकºयांच्या समस्या कमी न होता वाढत चालल्याची स्थानिकांची भावना आहे. चैनू जाधव यांनी याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. जाधव यांनी पक्षप्रमुखांना शेतकºयांवर झालेल्या अत्याचाराचा तपशील दिला. तेव्हा शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी नेवाळीतील शेतकºयांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

Web Title:  Navneeti talks with Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.