आजपासून नवरात्रोत्सव , ठाणे शहरात दीड हजार मूर्तींचे झाले आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 12:57 AM2019-09-29T00:57:08+5:302019-09-29T00:57:22+5:30

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड हजार सार्वजनिक व खाजगी देवीच्या मूर्तींचे रविवारी मोठ्या धुमधुडाक्यात आगमन होणार आहे.

 Navratrotsav Start from today, one and a half thousand idols have arrived today | आजपासून नवरात्रोत्सव , ठाणे शहरात दीड हजार मूर्तींचे झाले आगमन

आजपासून नवरात्रोत्सव , ठाणे शहरात दीड हजार मूर्तींचे झाले आगमन

Next

ठाणे : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड हजार सार्वजनिक व खाजगी देवीच्या मूर्तींचे रविवारी मोठ्या धुमधुडाक्यात आगमन होणार आहे. दोन हजार ७४६ ठिकाणी घट व कलश तसेच प्रतिमा बसवण्यात येणार आहेत.अशाप्रकारे एकूण चार हजार २३२ मूर्ती, घट आणि प्रतिमांची पूजाअर्चा रविवारपासून सलग नऊ दिवस केली जाणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये.यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह सुमारे पाच हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहर आयुक्तालयातील परिमंडळ एक ठाणे शहरामध्ये सार्वजनिक स्वरु पाच्या ११२ तर खाजगी २३१ मूर्ती आणि सार्वजनिक स्वरु पाचे ११ आणि खाजगी ६८४ घटस्थापन होणार आहेत. परिमंडळ २ भिवंडीमध्ये ८७ सार्वजनिक आणि १९३ खाजगी मूर्ती तर सहा सार्वजनिक, एक हजार १२३ खाजगी घट; परिमंडळ ३ कल्याणमध्ये १३४ सार्वजनिक अन १६१ खाजगी मूर्ती तर १२ सार्वजनिक अन ४९० खाजगी घट; परिमंडळ ४ उल्हासनगरमध्ये सार्वजनिक ११७ मूर्ती आणि ८४ खाजगी मूर्ती तर आठ सार्वजनिक व ३८९ खाजगी ठिकाणी घटस्थापना होणार आहे. तसेच परिमंडळ ५ वागळे इस्टेटमध्ये १५३ सार्वजनिक आणि २१४ खाजगी मूर्ती तर १२ सार्वजनिक आणि ११ खाजगी घटांची स्थापना होणार आहे.
दरम्यान, ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या शहरातील उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाच पोलीस उपायुक्त, १२ सहायक पोलीस आयुक्त,९७ पोलीस निरीक्षक, २६७ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तीन हजार ६५७ पोलीस कर्मचारी तसेच तीन एसआरपीएफच्या तुकड्यासह ६०० होमगार्डची फौज असा चोख बंदोबस्त ठेवला आहे. नवरात्रोत्सवात तरु णाई रासगरबा खेळण्यास बाहेर पडत असल्याने साध्या वेषातही पोलीस तैनात राहणार आहेत.
 

Web Title:  Navratrotsav Start from today, one and a half thousand idols have arrived today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.