पाच कोटींच्या खर्चातून जि.प.च्या शाळांना मिळणार नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 05:38 AM2018-11-11T05:38:31+5:302018-11-11T05:38:56+5:30

ठाणे जिल्ह्यातील १३३ पाणीयोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात विहिरीतून पाणीपुरवठा करणाऱ्या २० योजनांचा समावेश आहे.

Navsanjivani will get the ZP schools from the expenditure of five crores | पाच कोटींच्या खर्चातून जि.प.च्या शाळांना मिळणार नवसंजीवनी

पाच कोटींच्या खर्चातून जि.प.च्या शाळांना मिळणार नवसंजीवनी

Next

ठाणे/मुरबाड : जिल्हा परिषदेच्या शाळा काही वर्षांपासून नादुरु स्त व मोडकळीस आलेल्या आहेत. पण, आता या शाळांच्या वर्गखोल्यांना नवसंजीवनी मिळून त्या कात टाकणार आहेत. यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय, जिल्ह्यातील प्राथमिक शाळा टप्प्याटप्प्याने डिजिटल करण्याचा प्रयत्नदेखील केला जाईल, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली.
शाळांच्या दुरुस्तीसह नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रु पयांची तरतूद केली आहे. या प्रस्तावाला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाली. यामुळे लवकरच या कामाच्या निविदा काढून कामे सुरू होतील.

नव्या वर्गखोल्यांचे बांधकाम केले जाईल. यासाठी १३ कोटी रु पयांची तरतूद केली आहे, असे पवार यांनी निदर्शनास आणून दिले. सध्या अनेक शाळांमध्ये एक वर्ग डिजिटल करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे शिक्षण द्यावे लागते. त्यामुळे सर्व वर्ग टप्प्याटप्प्याने डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. याकरिता टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. यंदा जिल्हा परिषदेकडून आदिवासी भागातील शिक्षकांच्या भरतीसाठी विशेष प्रयत्न झाले. त्यामुळे आदिवासी भागातील शाळांमध्ये आता १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती असल्याचे पवार यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील १३३ पाणीयोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात विहिरीतून पाणीपुरवठा करणाऱ्या २० योजनांचा समावेश आहे.
च्जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांसाठी ४२ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. याशिवाय, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथेही रस्ता तयार केला जाईल.
 

Web Title: Navsanjivani will get the ZP schools from the expenditure of five crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.