ठाण्यात महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी; मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलनाला शिवसेनेची दांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 02:08 PM2022-02-25T14:08:52+5:302022-02-25T14:09:10+5:30

मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन, आजचे आंदोलन हे भाजपच्या दडपशाहीच्या विरोधातील आंदोलन आहे. त्यामुळे आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलो आहोत

Nawab Malik: Shiv sena its not participate in NCP-Congress Agitation against Central government | ठाण्यात महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी; मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलनाला शिवसेनेची दांडी

ठाण्यात महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी; मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलनाला शिवसेनेची दांडी

Next

रणजीत इंगळे 

ठाणे - आघाडीत सगळं काही सुरळीत असल्याचं बोललं जात असलं तरी ठाण्यात मात्र आघाडीत बिघाडी झाल्याचं पुन्हा एकदा दिसून आल आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना  अटक झाल्यानंतर ठाण्यात महाविकास आघाडीने आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली शिवसेना मात्र कुठेही दिसली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आल आहे. शिवसेनेच्या प्रश्नाबद्दल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता आम्ही त्यांना माहिती दिली होते तरीदेखील ते आले नसल्याचे सांगितले. त्यामुळे आघाडीत पुन्हा बिघाडी झाल्याची चर्चा आहे. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या  पक्षांच्यावतीने शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईडी आणि केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडन विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सीबीआय,  एनआयए,  आयकर विभाग, आणि ईडी या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केली. मोदी सरकार हा हाय हाय, ईडी झाली येडी, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. 

यावेळी आनंद परांजपे म्हणाले की, आता लढा सुरु झालेला आहे. महविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत.  ज्यावेळी इडी अस्तित्वात नव्हती त्यावेळी घडलेल्या कृतीला आता लक्ष्य केले जात असेल तर त्यामध्ये राजकारण नाही का? ईडीच्या धाडी कोणाच्या घरावर पडणार आहेत हे भाजपावाल्यांना आधीच कळते. म्हणजेच ईडी ही भाजपाकडूनच चालविली जाते. हेच स्पष्ट होत आहे. गुरुवारी भाजपवाल्यांनी नवाब मलिक यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करुन त्यांचा अपमान केला आहे. हा आरोप करणार्‍या भाजपने आधी उत्तर द्यावे की,  नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला बिर्याणी खायला पाकिस्तानात पंतप्रधान का गेले होते? नांदेड-मालेगावमधील बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग या भाजपच्या खासदार कशा झाल्या?  कर्नल पुरोहितशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तांदोलन का केले?  याची उत्तरे आधी भाजपवाल्यांनी द्यावीत नंतर मोदी सरकारचा कारभार देशहितासाठी एक्स्पोज करणार्‍या मलिक यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे? असा टोला परांजपे यांनी लगावला.

विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, आजचे आंदोलन हे भाजपच्या दडपशाहीच्या विरोधातील आंदोलन आहे. त्यामुळे आम्ही सर्व खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलो आहोत. सर्व सेक्युलर पक्ष रस्त्यावर  उतरले आहेत. दाऊदला फरफटत आणू, असे म्हणणारे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत बैठक करतात; या बैठकीला स्वत: दाऊद उपस्थित होता. असे असताना 30 वर्षांपूर्वीच्या काही घटना समोर धरुन नवाब मलिकांना खोट्या आरोपांखाली अडकविण्यात आले आहे. वास्तविक, दाऊद आणि आयएसआयसोबत भाजपनेच हातमिळविणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गटनेते नजीब मुल्ला यांनीही यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. जे लोक विरोधात बोलतात त्यांना टार्गेट केले जात आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना पराभव दिसत असल्यानेच हे घाणेरडे राजकारण भाजपने केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरु केले आहे.  जो पर्यंत भाजप संपणार नाही; तोचपर्यंत हा लढा सुरुच राहणार आहे; नवाब मलिक हे निर्दोष असूनते मुस्लीम असल्यानेच त्यांना दाऊदचे नाव जोडण्यात आले आहे. प्रत्येकवेळी मुस्लीम नेतृत्व पुढे आले की त्यांना अडकविण्याचा भाजपचा हा प्रयत्न नेहमी असतो, अशी टीका मुल्ला यांनी केली.

Web Title: Nawab Malik: Shiv sena its not participate in NCP-Congress Agitation against Central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.