गडचिरोलीतील नक्षलवाद समूळ नष्ट करणार - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 01:47 PM2020-01-10T13:47:05+5:302020-01-10T13:55:13+5:30

शिंदे यांनी ठाण्याचा विकास करणार असल्याचे म्हटले आहे.

Naxalism in Gadchiroli will destroy says Eknath Shinde | गडचिरोलीतील नक्षलवाद समूळ नष्ट करणार - एकनाथ शिंदे

गडचिरोलीतील नक्षलवाद समूळ नष्ट करणार - एकनाथ शिंदे

Next

ठाणे - राज्याचे नगरविकास मंत्री व गडचिरोली आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच गडचिरोली भागातील नक्षलवादाचा समूळ नायनाट करणार असे ठाम प्रतिपादन केले आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे यांच्यावर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची धुराही नुकतीच सोपवण्यात आली आहे.

ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी,ठाणे संचालित ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांच्याहस्ते शैक्षणिक वर्षात शिक्षण, क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी बोलताना शिंदे यांनी ठाणेकर जनता व पक्षश्रेष्ठी यांच्या आशीर्वादामुळे शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता, शाखाप्रमुख ते राज्याचा कॅबिनेट मंत्री झाल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. तसेच,ठाणेकरांच्याच आशीर्वादामुळे ७० टक्के नागरिकांशी निगडित असलेले आधी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकाससारख्या  महत्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली.तेव्हा,ठाणे जिल्ह्याबरोबर नक्षलवादी क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील जबाबदारी मिळाली असल्याने ठाण्याच्या विकासाबरोबर गडचिरोली भागातील नक्षलवादाचा समूळ नायनाट करू असा विश्वास शिंदे त्यांनी व्यक्त केला आहे. 

जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. आणि या सरकारमध्ये मिळालेल्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडत ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्राचा विकास करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. दरम्यान,सर्वसामान्य गोरगरीब मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किंबहुना या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ज्ञानपीठसारखी संस्था काम करीत आहे. या ज्ञानपीठ विद्यालयात नुकतेच ज्युनियर कॉलेजदेखील सुरू झाले. तेव्हा भविष्यात लवकरच सिनियर कॉलेज सुरू व्हावे. यासाठी आवर्जून मदत करू अशा शुभेच्छाही त्यांनी संस्थेला दिल्या. ज्ञानपीठसारख्या संस्था पुढे जाण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आवश्यक असलेले सहकार्य करण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

याप्रसंगी शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख व माण तालुका संपर्कप्रमुख शंकर वीरकर, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, नगरसेवक भूषण भोईर,रोटरी क्लब ऑफ ठाणे अच्युत दामले, आरती इंडस्ट्रीज डायरेक्टर पुंडलिक उमरे, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब दगडे, उपाध्यक्ष दिगंबर चोरमले, सचिव भगवान पाटील, सहसचिव प्रदीप निकम, खजिनदार बबन चव्हाण, सहखजिनदार राजेंद्र निकम, कार्याध्यक्ष अरविंद जानकर, उपकार्याध्यक्ष हनुमंत ढवळे, भीमराव जानकर, संचालक संतोष दगडे, पंकज पाटील, मुख्याध्यापक प्रभाकर पाटील, मुख्याध्यपिका माधुरी ढवळे आदी सह मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: Naxalism in Gadchiroli will destroy says Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.