जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून जशास तसे उत्तर: आनंद परांजपे

By अजित मांडके | Published: August 28, 2023 04:00 PM2023-08-28T16:00:17+5:302023-08-28T16:00:58+5:30

यावेळी जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, छगन भुजबळ झिंदाबाद, एकच वादा अजित दादा अशा घोषणा दिल्या.

ncp anand paranjape criticised jitendra awhad | जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून जशास तसे उत्तर: आनंद परांजपे

जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून जशास तसे उत्तर: आनंद परांजपे

googlenewsNext

अजित मांडके (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मंत्री छगन भुजबळ यांचा पुतळा जाळणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून जशास तसे उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने  छगन भुजबळ यांच्या कथीत उद्गाराचा आधार घेत भुजबळ यांना गद्दार संबोधून ठाण्यात त्यांचा पुतळा जाळण्यात आला. यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ठाण्तातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि क्रियेस प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेसमोर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी केली. यावेळी जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, छगन भुजबळ झिंदाबाद, एकच वादा अजित दादा अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिताताई गोतपगार, ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नित्यानंद उर्फ वीरु वाघमारे, ठामपा परिवहन सदस्य मोहसीन शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आनंद परांजपे यांनी म्हटले की, आमचे आदरणीय नेते व बहुजनांचे नेते छगन भुजबळसाहेब यांनी काही कथित वक्तव्य केली म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळसाहेबांचा पुतळा जाळला. त्यांना गद्दार म्हटले. आव्हाड यांच विरोध केला की गद्दार ! मुळात गद्दार कोण हे या क्रियेवर प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादी काॅग्रेस कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळला उत्तर दिले असून यापुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. हातात दोरा गंडा बांधून पुरोगामी भाषा करुन कोणी बहुजन नेता होत नाही. यांचे ठाणे व येऊर येथील बंगल्यात काय धंदे चालतात त्याची शोधपत्रकारिता करावी, असा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिला.

Web Title: ncp anand paranjape criticised jitendra awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.