Ulhasnagar: उल्हासनगरात रस्ता बांधणीवरून राष्ट्रवादी व भाजप आमने-सामने, आयुक्तांकडून रस्त्याची पाहणी
By सदानंद नाईक | Published: October 19, 2023 05:34 PM2023-10-19T17:34:02+5:302023-10-19T17:35:33+5:30
Ulhasnagar: कॅम्प नं-३ पंजाबी कॉलनीतील रस्ता रुंदीकरणावरून राष्ट्रवादी व भाजप आमने-सामने आल्यावर रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. अखेर आयुक्त अजीज शेख यांनी गुरवारी रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दिला आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-३ पंजाबी कॉलनीतील रस्ता रुंदीकरणावरून राष्ट्रवादी व भाजप आमने-सामने आल्यावर रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. अखेर आयुक्त अजीज शेख यांनी गुरवारी रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दिला आहे. रस्ता रुंदीकरणात अनेक घरे व दुकाने बाधित होणार आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, येथील पंजाबी कॉलनी ते क्रीटीकेअर हॉस्पिटल दरम्याचा रस्ता शहर विकास आराखड्यात ६० फुट आहे. मात्र रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने, रस्ता रुंदीकरणात कमीतकमी दुकाने व घरे बाधित व्हावे यासाठी रस्ता ४० फूट रुंदीकरण्याला महासभेने मान्यता दिली. त्यानुसार ५ कोटीच्या निधीतून रस्ता बांधणीचे काम सुरू झाले. मात्र दुकाने व घरे बाधित होऊ नये यासाठी जसी जागा आहे, त्याप्रमाणे रस्ता बांधणीची मागणी झाली. रस्ता बांधणीवरून भाजप व राष्ट्रवादी आमने-सामने आल्यावर आयुक्त अजीज शेख यांनी गुरवारी रस्त्याची पाहणी करून शहर विकासासाठी मार्किंग केल्या प्रमाणे ४० फूट रस्ता बांधणी होणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले.
शहरात कोट्यवधीच्या निधीतून विविध रस्त्याची बांधणी सुरू आहे. मात्र शहर विकास आराखड्यानुसार रस्ते बांधले जात नसल्याने, भविष्यात शहर कसे? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. शहरातील बहुतांश रस्ते अरुंद असून त्याच प्रमाणात बांधलेतर, भविष्यात शहराचा विकास खुंटणार असल्याचे बोलले जात आहे.