सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी

By नितीन पंडित | Published: June 2, 2023 07:37 PM2023-06-02T19:37:18+5:302023-06-02T19:37:36+5:30

इंडिक टेल्स व हिंदू पोस्ट या दोन वेबसाइट तात्काळ बंद करण्याची मागणी.

NCP demands action against those who write offensively on Savitribai Phule | सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी

सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी

googlenewsNext

भिवंडी : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्य लिखाण करणारी इंडिक टेल्स व हिंदू पोस्ट या दोन वेबसाइट तात्काळ बंद करू वेबसाईट चालवणारे व लिखाण व प्रसार करणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शोएब गुड्डू यांनी यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रांत अधीकार कार्यालयात व पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन देत आपला राग व्यक्त केला आहे.

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला शराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी सावित्रीमाई फुले यांचा अपमान व पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर यांची अवहेलना महाराष्ट्र सदनात तसेच नवीन संसद भावनाच्या उदघाटना प्रसंगी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांची अवहेलना व स्वर्णपदक विजेत्यांचे कुस्तीवीर महिला यांचे लैंगिक अत्याचारा विरोधी आंदोलन चिरडून काढताना जी अमानुष कारवाई करण्यात आली या सर्व घटना महिला विरोधी असून मनुवादी आहेत अशी भूमिका घेत या सर्व घटनांमुळे संविधानिक हक्काचे हनन झाले असून हे सरकार महिला विरोधी सरकार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात निवेदन गृहमंत्री अमित शाह व लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिडला यांना प्रांत अधिकारी यांच्या मार्फत आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: NCP demands action against those who write offensively on Savitribai Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.