राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ आली: जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:16 PM2022-07-30T17:16:58+5:302022-07-30T17:17:36+5:30
सर्व मराठी माणसांनी एकत्न येऊन राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ आता आली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
ठाणे :
सर्व मराठी माणसांनी एकत्न येऊन राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ आता आली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सोमवारी त्यांच्या विरोधात जोडोमार आंदोलन करण्यात येणार असून तेच जोडे त्यांना पाठविले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलण्यासंदर्भात आव्हाड यांनी शनिवारी पत्नकार परिषद आयोजित केली होती.
यापूर्वीही राज्यपाल कोश्यारी यांनी राज्याचा वारंवार अपमान केला आहे.जेव्हा राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान केला तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवायला हवी होती. राज्यपालांना महामहीम म्हणून बोलले जाते. मात्र आता त्यांची ती देखील लायकी राहिलेली नाही. त्यांनी मराठी माणसाचा नाही तर त्यांच्या अस्मितेचा अपमान केला आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा अपमान कधीही सहन करणार नाही. मुंबई ही सहजा सहजी मिळाली नसून त्याकरिता रक्ताचे पाट वाहले आहेत. मुंबई हे देशाचे व्यवसायिक रूप असलेले शहर आहे. यश हा मुंबईच्या मातीचा गुण असून राज्यपालांनी जे वक्तव्य केले आहे. त्याने सह्याद्रीचा मराठी मातीचा अपमान झाला आहे. परिणामी आता सर्वच मराठी माणसांनी एकत्न येऊन राजभवनात घुसून या राज्यपालांनाच हाकलून देण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात सोमवारी आंदोलन करणार आहे. त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून तेच जोडे त्यांना भेट म्हणून पाठविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.