Maharashtra Bandh: मावळ गोळीबाराला NCP चं समर्थन? जितेंद्र आव्हाड म्हणतात, नेत्याच्या पोरानं गोळीबार केला नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 11:28 AM2021-10-12T11:28:05+5:302021-10-12T11:33:10+5:30

Maharashtra Bandh: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मावळ येथील गोळीबारासंदर्भात केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिलेय

ncp jitendra awhad replied bjp devendra fadnavis criticism over maval firing | Maharashtra Bandh: मावळ गोळीबाराला NCP चं समर्थन? जितेंद्र आव्हाड म्हणतात, नेत्याच्या पोरानं गोळीबार केला नव्हता

Maharashtra Bandh: मावळ गोळीबाराला NCP चं समर्थन? जितेंद्र आव्हाड म्हणतात, नेत्याच्या पोरानं गोळीबार केला नव्हता

Next
ठळक मुद्देमावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होतासत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज दिसून येतोतर फडणवीसांची माणुसकी दिसली असती

ठाणे: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Incident) येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Bandh) राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरी राजकीय आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप, मनसे अशा पक्षांनी या बंदला विरोध करताना ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मावळ येथील गोळीबारासंदर्भात केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर देत, मावळ येथील गोळीबार पोलिसांनी केला होता. नेत्याच्या मुलाने नाही, असे म्हटले आहे. 

लखीमपूर खेरीच्या घटनेची तुलना जालियनवाला बागशी केल्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का? राजस्थानमध्ये चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांना तुडवले गेले, काँग्रेस सरकारने बेछूट मारले, त्यावर का बोलत नाही? हे राजकीय वक्तव्य करत आहेत, हे राजकीय पोळी भाजण्याचे काम आहे. शेतकऱ्यांवर खरा अन्याय यांनीच केलाय, अशी टीका फडणवीसांनी केली होती. याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर पलटवार केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. 

मावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता

मावळची दुर्घटना घडली. त्याची चौकशी केली. तो गोळीबार कसा गरजेचा होता, हे न्यायाधीशांनी मान्य केले. तुम्हाला संधी दिली होती ना तेव्हा. तुम्ही विरोधी पक्षात होता ना. त्यामुळे मावळचे उदाहरण देऊ नका. मावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. पोलिसांच्या हातातून बंदुका घेऊन कोणत्या नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता. इथे या देशाच्या गृहराज्यमंत्र्याचा पोरगा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून चक्क गाडी घेऊन जातो. मावळचा गोळीबार हा पोलिसांचा होता. पोलीस आणि सामान्य जनतेत काही फरक आहे की नाही, असा प्रतिप्रश्न आव्हाड यांनी केला आहे. 

सत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज दिसून येतो

अमानवी कृत्याचे दुःख होणे हे माणुसकीचे लक्षण आहे. सत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज हा त्या घटनेतून दिसून येतो. गरीब शेतकरी रस्त्यावर उभे आहेत. मागून जीप आणून अंगावर घालायची आणि नऊ जणांना चिरडून मारायचे यांच्याबद्दल वाईट वाटणारच नसेल, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शेतकरी कुठलाही असो शेवटी तो या देशाचा शेतकरी आहे ना? उत्तर प्रदेशातील त्याच भागात सर्वाधिक गहू उगतो. तुमच्या घरातील पोळ्या या तिथूनच आलेल्या गव्हाच्या बनवल्या जातात. तुमच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत काय हेच या सर्व घटनेतून दिसून येते, या शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

तर फडणवीसांची माणुसकी दिसली असती

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात आहेत. सत्ताधाऱ्यांनी बंद केला आहे. त्यामुळे ते बोलणारच. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. शेवटी ते विरोधक आहेत. पण जे चिरडून मारले गेले त्यांच्याबद्दल संवेदना दाखवल्या असत्या तर त्यांच्यातली माणुसकी दिसली असती. जिवंतपणा दिसला असता, असा टोलाही आव्हाडांनी लगावला. 
 

Web Title: ncp jitendra awhad replied bjp devendra fadnavis criticism over maval firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.