राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत गुंडांचा भरणा; जितेंद्र आव्हाडांसमोरच उल्हासनगरात राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 09:37 AM2022-02-24T09:37:56+5:302022-02-24T09:40:42+5:30
पक्षाला नागरिकांना काय संदेश द्यायचा आहे, राष्ट्रवादीच्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
उल्हासनगर : गेल्या आठवड्यात शहराध्यक्ष पंचम कलानी यांनी राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर केली. या कार्यकारिणीत गुंडांचा भरणा केला आहे. यातून पक्षाला नागरिकांना काय संदेश द्यायचा आहे, असा सवाल करून थेट घरचा आहेर दिला आहे.
जिल्हा कार्यकारिणी जाहीर करताना राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित हाेते. या कार्यक्रमात शक्तिप्रदर्शनासाठी गर्दी झाली हाेती. त्यावेळी दाेन गटांत हाणामारी झाल्याचेही पाहायला मिळाले हाेते. कलानी कुटुंब राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी पक्षाचे नेतृत्व भारत गंगाेत्री यांच्याकडे हाेते. पाच वर्षे त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यांची प्रदेश चिटणीसपदी नेमणूक करण्यात आली, तर शहराध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या साेनिया काैर धामी यांची पदेश सरचिटणीसपदी निवड झाली. मात्र, कलानी कुटुंबाचे नेतृत्व गंगाेत्री गट स्वीकारेल का, हा प्रश्न कायम हाेता. पंचम कलानी याच उल्हासनगरच्या कॅप्टन राहतील, असे सूचक वक्तव्य करून आव्हाड यांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आदेश दिले.
त्यानंतरही गंगाेत्री यांनी जिल्हा कार्यकारिणीवर टीका करून पक्षाला घरचा आहेर दिला आहे. या वक्तव्यानंतर गंगाेत्री यांच्या पक्षविराेधी वक्तव्याने त्यांच्यावर कारवाई हाेणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.