आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीला नाही : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 06:04 AM2022-05-04T06:04:01+5:302022-05-04T06:04:40+5:30
आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात; बाभळीच्या झाडाकडे लोक ढुंकूनही पाहत नाहीत, सुप्रिया सुळेंचे सूचक विधान.
आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात; बाभळीच्या झाडाकडे लोक ढुंकूनही पाहत नाहीत, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक टोला लगावला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त त्या मंगळवारी ठाण्यात आल्या होत्या.
माझे सर्व आयुष्य हे यशवंतराव चव्हाण यांना आदर्श मानूनच जगत आलेली आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी दिवस, वार याची गरज मला भासत नाही, असे सुळे म्हणाल्या.
नबाब मलिक यांच्याबाबत त्यांनी सांगितले की, मलिक हे आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांच्या मुलींनी माझ्याशी चर्चा केली आहे. आता त्यांच्यावर चांगले उपचार सुरू आहेत. आम्ही मांडत असलेला विचार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वीकारला आहे. छप्पन इंच वगैरे या गोष्टी भाषणापुरत्या ठीक आहेत. वास्तवात त्याचा काही उपयोग नसतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.