राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 11:10 PM2020-08-22T23:10:48+5:302020-08-22T23:11:09+5:30
कारमधून तेथे पोहचलेल्या निलेश कापडणे आणि भगत याच्यांमध्ये वादावादी झाली.त्यावेळी दोघांनी एकमेकांना मारहाण केली.
मुंब्राः कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस उपनिरिक्षकाला मारहाण केल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेठाणे जिल्हा चिटणिस मनोज कोकणेसह इतर पाच जणांना पोलिसांनी अटक केली.शुक्रवारी रात्री दिवा नाका येथे वाहतूक कोंडी झाली होती.ती फोडण्या प्रयत्न रिक्षा चालक दिपक भगत करत होते.त्यावेळी कारमधून तेथे पोहचलेल्या निलेश कापडणे आणि भगत याच्यांमध्ये वादावादी झाली.त्यावेळी दोघांनी एकमेकांना मारहाण केली.
याबाबतची तक्रार करण्यासाठी दिवा पोलिस चौकीत पोहचलेल्या कापडणेला पोलिसांनी प्रथम वैद्यकीय तपासणी करुन ये,त्यानंतर तक्रार दाखल करुन घेतो असे सागितले.हे कळताच कोकणे त्यांच्या 20 ते 25 समर्थकांना घेऊन चौकीजवळ पोहचले आणि कापडणे याला मारहाण केलेल्याला अटक करण्याची मागणी करु लागले.तेथे उपस्थित असलेले पोलिस उपनिरीक्षक सचिन सरडे यांनी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तक्रार दाखल करुन घेऊन कायदेशीर कारवाई सुरु करतो असे सागितले.यामुळे संतप्त होऊन कोकणे आणि त्यांच्या समर्थकांनी रस्ता रोको आंदोलन केले.
त्यांना तसे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सरडे यांनी केला असता हा नेहमी असेच बोलतो असे बोलून कोकणे यानी जमलेल्यांना सरडे यांच्या विरोधात चिथवले.यामुळे जमलेल्या जमावाने सरडे आणि इतर पोलिसांना घेराव घालून धक्काबुक्की केली.यावेळी कोकणे यानी त्याच्याजवळील छत्री सरडे यांच्या डोक्यावर मारली तसेच राहूल शिंदे याने पक्षाचा झेंडा लावलेल्या काठीने त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर प्रहार केला.याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारी वरुन कोकणे,शिंदे तसेच विषय वाघ,सुर्यकांत कदम,हिमांशु कदम या पाच जणांना शनिवारी संध्याकाळी अटक केली.