Video : टोलवसुली बंद करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रसेचं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 11:47 AM2018-05-14T11:47:15+5:302018-05-14T11:53:57+5:30
मुंब्रा बायपासचं काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली व मुलुंडच्या टोलनाक्यावरील टोल वसुली बंद ठेवण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सोमवारी आंदोलन केले.
ठाणे : मुंब्रा बायपासचं काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली व मुलुंडच्या टोलनाक्यावरील टोल वसुली बंद ठेवण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सोमवारी (14 मे) आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं हे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावरील टोल वसुली बंद पाडण्यात आली. शिवाय, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यापासून मुंब्रा बायपासचे दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. पुढील दोन महिने हे काम सुरू असणार आहे. यापार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊन ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. प्रवाशांना होणार हा त्रास टाळण्यासाठी टोल वसुली थांबावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
मुंब्रा बायपास मार्ग 2 महिने बंद
मुंब्रा बायपास मार्ग दुरुस्तीसाठी पुढील दोन महिने बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक मुलुंड-ऐरोली मार्गे ठाणे-बेलापूर मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर मंगळवारपासून वाहनांची मोठी कोंडी होत आहे. याचा फटका शहराअंतर्गत वाहतुकीलाही बसला आहे. ही परिस्थिती पुढील दोन महिने कायम राहणार असल्याने वाहतूक पोलिसांची तारांबळ उडणार आहे.