महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचा घंटानाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 03:19 PM2019-06-12T15:19:26+5:302019-06-12T15:20:08+5:30

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले.

NCP protest against women violence | महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचा घंटानाद

महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचा घंटानाद

Next

ठाणे  - गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. 

गेल्या काही दिवसांपासून महिला आणि लहान मुलींवरील बलात्कार, विनयभंगांच्या गुन्ह्यांची संख्या वाढीस लागली आहे. गुन्हेगारांवर राज्याच्या गृहखात्याचा वचक नसल्यामुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिला कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद तसेच थाळी नाद केला. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या नगरसेविका अपर्णा साळवी, राधाबाई जाधवर, अनिता किणे, अंकिता शिंदे, आरती गायकवाड यांच्यासह युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, विजया दामले, मेहरबानो पटेल, शशी पुजारी, अनिता मोठे, पूनम वालिया, स्मिता पारकर, कांत गपमल, वंदना हुंडारे, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, गीता शिंदे, भानुपती पाटील, इंदू भोसले, सुविणा भिलारे, पुजा जाधव आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

यावेळी सुजाता घाग यांनी सांगितले की, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाजप सरकारच्या काळात आता महिला व मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत. इतकेच नाहीतर महिलांना सुरक्षा देण्यात सरकार हतबल ठरले आहे. त्यामुळे असुरक्षिततेच्या वातावरणामुळे भयभीत झालेल्या व अत्याचारपीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावरची लढाई लढणार असून, यासाठी प्रत्येक महिलेने पेटून उठणे गरजेचे आहे. तसेच, सरकारनेही या नराधमांवर वचक प्रस्थापित केला पाहिजे. जर, अत्याचारांच्या घटनांमध्ये घट झाली नाही तर आम्ही या सरकारच्याच गळ्यात घंटानाद करु, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: NCP protest against women violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.