जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी; NCP चे प्रदेश सरचिटणिस सय्यद अली अशरफ यांची मागणी 

By कुमार बडदे | Published: February 16, 2023 07:37 PM2023-02-16T19:37:56+5:302023-02-16T19:38:42+5:30

 जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी NCP चे प्रदेश सरचिटणिस सय्यद अली अशरफ यांनी केली. 

 NCP regional general secretary Syed Ali Ashraf demanded an apology from Jitendra AwhaD |  जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी; NCP चे प्रदेश सरचिटणिस सय्यद अली अशरफ यांची मागणी 

 जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी; NCP चे प्रदेश सरचिटणिस सय्यद अली अशरफ यांची मागणी 

googlenewsNext

मुंब्रा (ठाणे) : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी औरंगजेब याच्याबाबत केलेल्या विधानमुळे एकीकडे त्यांचे विरोधक त्यांच्या विरोधात उभे ठाकले असतानाच,आता त्यांच्याच पक्षाचे प्रदेश सरचिटणिस सय्यद अली अशरफ यांनी देखील त्यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा मतदारसंघ असलेल्या मुंब्रा येथील नागरिक तसेच पक्षाचे बहुतांशी कार्यकर्ते देखील त्यांच्या विधानावर नाराज झाले असल्याचा दावा अशरफ यांनी गुरुवारी केला.

विरोधक देखील त्यांच्या त्या विधानाचा राजकीय हेतूने लाभ उठवत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या विधानाबाबाबत माफी मागून विषय संपुष्टात आणावा असे त्यांना सुचवण्यात आले असून, यावर लवकरच स्पष्टीकरण देण्याचे त्यांनी मान्य केल्याची माहिती अशरफ यांनी लोकमतला दिली.अन्यथा त्यांनी केलेल्या विधानाचे विपरीत परीणाम आगामी महापालिका तसेच विधानसभा निवडणूकीत पडण्याची दाट शक्यता त्यांनी व्यक्त केली.

 

Web Title:  NCP regional general secretary Syed Ali Ashraf demanded an apology from Jitendra AwhaD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.