भिवंडीतून राष्ट्रवादी पक्षाने धाडली व्यंकय्या नायडूंना दहा हजार पत्रे  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:37 PM2020-07-27T17:37:56+5:302020-07-27T17:38:29+5:30

राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना अशा घोषणा देता येणार नाहीत, असे दरडावले असता त्याच्या तीव्र प्रतिक्रिया शिवप्रेमी जनतेमधून उमटत आहेत.

NCP sends 10,000 letters to Venkaiah Naidu from Bhiwandi | भिवंडीतून राष्ट्रवादी पक्षाने धाडली व्यंकय्या नायडूंना दहा हजार पत्रे  

भिवंडीतून राष्ट्रवादी पक्षाने धाडली व्यंकय्या नायडूंना दहा हजार पत्रे  

googlenewsNext

भिवंडी- राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिल्याने राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना अशा घोषणा देता येणार नाहीत, असे दरडावले असता त्याच्या तीव्र प्रतिक्रिया शिवप्रेमी जनतेमधून उमटत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर बांधल्यानं कोरोना जाणार आहे का, असा सवाल उपस्थित केल्याने भाजपा युवा मोर्चा तर्फे शरद पवार यांना श्रीरामाचे स्मरण करून देण्यासाठी पत्र धाडण्यात येत असून, त्यास प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करून देण्यासाठी 20 लाख पत्र पाठविण्याचे आव्हान देण्यात आले.

त्यानुसार सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहर व राष्ट्रवादी काँग्रेस महिला वतीने महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज असे लिहलेले तब्बल दहा हजार पत्र पोस्टा मार्फत रवाना केले असून भिवंडी शहरातील दांडेकर वाडी मुख्य पोस्ट कार्यालयात महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दांडेकर वाडी पोस्ट कार्यालया समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करीत दहा हजार पत्र पोस्ट पेटीत टाकण्यात आली. यावेळी जावेद फारुकी आसिफ खान यांसह या आंदोलनात शेकडो पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते .

Web Title: NCP sends 10,000 letters to Venkaiah Naidu from Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.