राष्ट्रवादीलाही मिळणार ठाणे परिवहन समितीचे सभापतीपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:02 AM2020-02-25T00:02:56+5:302020-02-25T00:03:11+5:30

शिवसेनेत अस्वस्थता; एक वर्षासाठी लागणार लॉटरी

NCP will also get the chairmanship of Thane Transport Committee | राष्ट्रवादीलाही मिळणार ठाणे परिवहन समितीचे सभापतीपद

राष्ट्रवादीलाही मिळणार ठाणे परिवहन समितीचे सभापतीपद

Next

- अजित मांडके 

ठाणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर स्थानिक पातळीवरदेखील त्याचे पडसाद उमटल्याचे चित्र आहे. यानुसारच ठाणे महापालिकेत विरोधी बाकावर असलेल्या राष्ट्रवादीलाही आता परिवहन समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक वर्ष सभापतीपद मिळणार असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पातळीवर याला विरोध असला तरी राज्य पातळीवरील समिकरणे टिकविण्यासाठी शिवसेनेला आता महाविकास आघाडीतील घटकांसोबत जुळवून घ्यावे लागत आहे.

ठाणे परिवहन समितीच्या सदस्यांची निवडणूक येत्या ४ मार्च रोजी होणार आहे. यावेळी विशेष महासभा घेऊन या सदस्यांची निवड केली जाणार आहे. परिवहन समितीत पक्षीय बलानुसार शिवसेनेचे सात सदस्य जाणे अपेक्षित आहे, तर राष्टÑवादीचे तीन आणि भाजपचे २ सदस्य जाणे अपेक्षित आहे. मात्र, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्टÑवादीने एक आणि काँग्रेसनेदेखील आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. दुसरीकडे सोमवारी झालेल्या शिवसेना आणि राष्टÑवादीच्या बैठकीत महाविकास आघाडीमुळे एक मित्र पक्षांना देण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे झाल्यास मनात नसतांनादेखील शिवसेनेला राष्टÑवादीसाठी परिवहन समितीचे सभापतीपद सोडावे लागणार आहे. आधीच काँग्रेसला परिवहनमध्ये सामावून घेण्यासाठी शिवसेनेला आपला एक उमेदवार मागे घ्यावा लागणार आहे. त्यात आता एक वर्षासाठी परिवहनच्या सभापतीपदावरही एक वर्षासाठी पाणी सोडावे लागणार आहे.

शिवसेनेची होतेय पीछेहाट
शिवसेनेत यामुळे अस्वस्थता पसरली असून महाविकास आघाडीमुळे राज्यात जरी फायदा झाला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र शिवसेनेची आता या निमित्ताने टप्प्याटप्प्याने पीछेहाट होणार असल्याचे चित्र या निमित्ताने दिसू लागले आहे.

 

Web Title: NCP will also get the chairmanship of Thane Transport Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.