राष्ट्रवादीचे 'चलो पनवेल', पीडब्ल्यूडी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 03:23 PM2017-10-06T15:23:16+5:302017-10-06T15:24:55+5:30

मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे.

NCP's 'Chalo Panvel', attacking the PWD office | राष्ट्रवादीचे 'चलो पनवेल', पीडब्ल्यूडी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा

राष्ट्रवादीचे 'चलो पनवेल', पीडब्ल्यूडी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा

Next

मुंब्रा - मुंब्र्याची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्र्याच्या नजीक बाय पास रस्ता तयार केला आहे. मात्र हा रस्ता निर्माण करताना येथील रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी न घेता बांधला आहे. आजवर या रत्यावर शेकडो मुंब्रावासियांना जीव गमवावा लागला आहे. आजही या रस्त्याच्या परिसरात राहणारे हजारो रहिवाशी जीव मुठीत घेऊन रात्र जागून काढीत आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीचा बायपास रस्ता नसून खुनी बायपास रस्ता बनला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विरोधात पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागावर हल्ला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा ते पनवेल असा हा संतप्त मुंब्रावासियांचा मोर्चा असणार आहे. त्यामध्ये लाखो मुंब्रावासीय सहभागी होणार आहेत. 

मुंब्र्याच्या जवळून डोंगराच्या कडेने गेलेला मुंब्रा बायपास या नावाने ओळखला जाणारा रस्ता आता खुनी रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मुंब्र्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन जीवितहानी आटोक्यात यावी यासाठी या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून रस्त्याच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी धोक्याचा बनला आहे. येथून होणाऱ्या जड वाहतुकीचा फटका नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. रस्त्यावर बेसुमार खड्डे पडल्याने गाड्या चालविणाऱ्यांना मोठे कसब करून रस्ता पार करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. आजवर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा मुब्रा विधानसभा अध्यक्ष आणि युवा नगरसेवक अशरफ शानू पठाण यांच्या पुढाकाराने आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलने केले. मात्र तरीही या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. आता पक्षाने पुन्हा हे खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक विभागाला ८ ऑक्टोबरपर्यंतचा वेळ देत इशारा दिला आहे. ८ ऑक्टोंबर पर्यंत हे खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर ९ ऑक्टोंबर रोजी पनवेल येथील हल्ला बोल मोर्चा काढण्यात येणार आहे. 

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने काढण्यात येणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान, युवा अध्यक्ष अशरफ शानु पठाणने माजी वेतन किमान आयोग के अध्यक्ष तथा  राज्यमंत्री सैय्यद अली अशरफ़, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, नईम खान, नगरसेवक सिराज डोंगरे, राजन किणे, मेराज खान, जफर नोमानी, मेरेशवर किणे,बाबाजी पाटील, नगरसेविका आशरीन राऊत, अनिता किणे,हफीजा नाईक, हसीना अजीज शेख,साजिया परविन अंसारी, सुलोचना हिरा पाटील, नादीरा यासीन सुरमे, सुनिता सातपुते, रूपाली गोटे, फरजाना शाकिर शेख, जमीला नासीर खान, मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष ब्बलु शेमना, कौसा ब्लॉक अध्यक्ष जावेद शेख मेडीकल, शिळ ब्लॉक अध्यक्ष मेहफूज शेख मामा, युवा अध्यक्ष कौसा ब्लॉक अध्यक्ष मैहसर शेख, कौसा कार्यध्यक्ष साकीब दाते, विदय़ार्थी सेल ठाणे शहऱ अध्यक्ष शाहरूख सैय्यद, मुंब्रा कळवा विदय़ार्थी सेल अध्यक्ष इम्रान हकीम, मुंब्रा कौसा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष सादिक शेख, ठाणे जिल्हा अध्यक्ष दिव्यांग विभाग मोहम्मद यूसुफ खान तथा पैरंट बाडी महिला कौसा ब्लॉक अध्यक्षा रिनी रिजवी, युवा महीला सेल, वियार्थी सेल, अल्पसंख्यांक विभाग, दिव्यांग विभागाचे पदाधिकारी आणि  कार्यकर्ते व  मुंब्रा शहर जागरूक रहिवाशी या मोर्चात सहभागी होणार आहेत. 

दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी हा मोर्चा निघणार असून त्यामध्ये सर्व मुंब्रावासीय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शमीम खान,  अशरफ़ शानु पठाण यांनी केले आहे. हा हल्लाबोल मोर्चा कौसा दोस्त अपार्टमेंट स्थित पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून जाणार असून मोर्चाकरिता बसची व्यवस्था केली आहे.  

Web Title: NCP's 'Chalo Panvel', attacking the PWD office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.