भिवंडीत कर वसुलीच्या खासगीकरणाविरोधात राष्ट्रवादीचं आमरण उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 07:11 PM2020-12-28T19:11:27+5:302020-12-28T20:06:31+5:30
राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी या ठरावाविरोधात आमरण उपोषणाचा हत्यार उपसला असून मनपाच्या मुख्यालया समोर सोमवार पासून राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे या आमरण उपोषणास बसल्या आहेत
भिवंडी ( दि २८ ) - भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला आहे . विशेष म्हणजे या ठरावावरून शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहेत. विविध पक्ष संघटनांसह अनेकांनी या ठरावास विरोध दर्शविला आहे. त्यातच आता या ठरावास राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देखील विरोध होत आहे.
राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी या ठरावाविरोधात आमरण उपोषणाचा हत्यार उपसला असून मनपाच्या मुख्यालया समोर सोमवार पासून राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे या आमरण उपोषणास बसल्या आहेत. शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसूल होत नाही त्यासाठी मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तसेच जाब विचारण्याची आवश्यकता असतांना थेट घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका देण्याचा हिट्लरशाही दाम राष्ट्रवादी पार्टी कदापि सहन करणार नाही , जोपर्यंत हा ठराव मनपा प्रशासन मागे घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दिली आहे.
दरम्यान सोमवारी सकाळी भिवंडी महानगरपालिकेतील महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करीत हा ठराव रद्द करण्याची मागणी केली. यावेळी महिला शहाराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी आपल्या शिष्ठमंडळासह मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांची भेट घेत ठराव रद्द करण्याची मागणी केली असता सदर ठरावातील कायदेशीर बाबी तपासल्या शिवाय हा ठराव मंजूर होणार नाही असे असावंआश्वासन आपल्याला मनपा आयुक्तांनी दिले असल्याची प्रतिक्रिया स्वाती कांबळे यांनी दिली आहे.