अपयशी पदाधिकाऱ्यांमुळे राष्ट्रवादीचे पानिपत, कार्यकर्त्यांनी वाजवली धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:01 AM2018-08-17T02:01:30+5:302018-08-17T02:01:33+5:30
ठाण्यात राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चेकमेट देण्यासाठी गणेश नाईक यांच्या गटातील संजय वढावकर यांना कार्याध्यक्षपद दिल्याने त्यांच्याविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.
ठाणे : ठाण्यात राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चेकमेट देण्यासाठी गणेश नाईक यांच्या गटातील संजय वढावकर यांना कार्याध्यक्षपद दिल्याने त्यांच्याविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. नाराज पदाधिकाºयांनी तर पक्ष कार्यालयात पाय न ठेवण्याची सूचना त्यांना केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागांतही नाईक गटातील पदाधिकाºयांनाच पुन्हा संधी दिल्याने त्या ठिकाणीसुद्धा नाराजी पसरली आहे.
मागील तीन ते चार वर्षांत नाईक यांच्या खांद्यावर ज्या-ज्या निवडणुकांची जबाबदारी दिली होती, त्या-त्या निवडणुकांत राष्टÑवादीचे पानिपतच झाले आहे. त्यामुळे पुन्हा श्रेष्ठींनी अशा अपयशी पदाधिकाºयांवर मेहरनजर कशासाठी केली, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याचा परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत राष्टÑवादीला भोगावा लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
मागील काही महिने प्रलंबित असलेल्या ठाणे जिल्ह्यातील राष्टÑवादीच्या नेमणुका सोमवारी जाहीर झाल्या. यामध्ये ठाणे शहराध्यक्षपदी पुन्हा आनंद परांजपे यांना कायम ठेवण्यात आले. परंतु, परांजपे किंबहुना आव्हाडांना शह देण्यासाठी नाईक फॅमिलीने संजय वढावकर यांच्या नावाची शिफारस करून कार्याध्यक्षपद मिळवले. दुसरीकडे दशरथ तिवरे (ठाणे ग्रामीण), रमेश हनुमंते (कल्याण-डोंबिवली), ज्योती कलानी (उल्हासनगर) आणि खलीद गुड्डू - भिवंडी शहर अध्यक्ष आणि अनिल फडतरे (कार्याध्यक्ष) अशा नियुक्त्या झाल्या आहेत. हे सर्व नाईक यांचे कट्टर समर्थक मानले जातात. परंतु, याच मंडळींचे मागील काही निवडणुकांतील काम पाहता राष्टÑवादी वाढण्याऐवजी कमीच झाली आहे.
एकेकाळी जिल्हा परिषदेवर कित्येक वर्षे राष्टÑवादीचे वर्चस्व होते. परंतु, मागील निवडणुकीत राष्टÑवादी येथे तिसºया क्रमांकावर फेकली गेली. त्यावेळी निवडणुकीची जबाबदारी गणेश नाईक यांच्या खांद्यावर होती, तर ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून दशरथ तिवरे हेच होते. वास्तविक, त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असताना त्यांना पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची बक्षिसी देण्यात आली. कल्याण-डोंबिवलीतही राष्टÑवादीने पुन्हा रमेश हणुमंते यांच्यावर विश्वास दाखवला. मागील महापालिका निवडणुकीत नाईक यांच्यावरच येथील जबाबदारी होती. परंतु, नगरसेवकांची संख्या केवळ दोन झाली. याला जबाबदार कोण होते, असा सवाल आता येथील कार्यकर्ते करू लागले आहेत. राष्टÑवादीचे येथे पानिपत झाले असताना पुन्हा त्यांनाच शहराध्यक्षपद कसे काय, असा सवालही केला जाऊ लागला आहे. भिवंडीतही राष्टÑवादीचे नऊ नगरसेवकांवरून झीरोवर खाते आले आहे. येथील निवडणुकीची जबाबदारीसुद्धा नाईक आणि त्यांचे समर्थक शहराध्यक्ष खलीद गुड्डू यांच्यावर होती. परंतु, ते अपयशी ठरले. उल्हासनगरमध्येही राष्टÑवादीची सत्ता होती. ती जाऊन याठिकाणी केवळ चार नगरसेवक निवडून आले. त्यातही आता पुन्हा ज्योती कलानी यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला. परंतु, कलानी सध्या राष्टÑवादीत आहेत की भाजपात, अशी चर्चा येथे नेहमीच सुरूआहे. एकूणच ज्याज्या ठिकाणी शहराध्यक्षांच्या फेरनियुक्त्या झाल्या आहेत, ते सर्वच शहराध्यक्ष सर्वच पातळ्यांवर फेल ठरले आहेत. किंबहुना, याला जबाबदार नाईक अॅण्ड फॅमिली असल्याचा सूर राष्टÑवादीची नाराज मंडळी करत आहेत. असे असताना पुन्हा त्याच व्यक्तींवर श्रेष्ठींनी विश्वास दाखवल्याने राष्टÑवादीचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावाच ते करू लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गढूळ वातावरण
एकीकडे जिल्ह्यात राष्टÑवादीचे पानिपत होत असतानाच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी राष्टÑवादीच्या विद्यमान १० ते १२ नगरसेवकांनी इतर पक्षांत प्रवेश केला होता. अशा परिस्थितीतही ठाण्यात परांजपे आणि आव्हाडांच्या नेतृत्वाखाली एक जागा जास्तीची जिंकत नगरसेवकांची संख्या ३५ झाली. आता अचानक संजय वढावकर यांची निवड झाल्याने ठाण्यात राष्टÑवादीचे वातावरण गढूळ झाले आहे.