ठाण्यात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, काढला बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 04:11 PM2018-02-07T16:11:55+5:302018-02-07T16:15:45+5:30

केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा गोर गरीब जनतेच्या हिताचा नसून हा अर्थसंकल्प गोर गरीब जनतेला लुटण्याचा प्रकार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने बैल गाडीवरुन मोर्चा काढून अनोखे आंदोलन केले.

NCP's unique rally against the Central Government in Thane; | ठाण्यात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, काढला बैलगाडी मोर्चा

ठाण्यात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, काढला बैलगाडी मोर्चा

Next
ठळक मुद्देचुलीवर केलेले अन्न केले ग्रहणमुंब्य्रात निघाला मोर्चा

ठाणे - केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प गरीबांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवर घाव घालणारा आहे. पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किंमती वाढविल्याने दूध, भाज्या यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. इंधनावर सेस टॅक्स वाढविल्याने त्याचा परिणाम गरिबांच्या अन्नावर झाला आहे. हा अर्थसंकल्प देशातील शेतकरी, मजूर, लहान व्यापारी, मध्यमवर्गीयांवर अन्याय करणारा आहे. याचाच अर्थ भाजप सरकार गरिबांच्या विरोधातील सरकार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सायकल आणि बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकर्त्यांनी चक्क चूल पेटवून त्यावर अन्न शिजवले.
                    केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंब्रा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. केंद्राने नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्या अर्थसंकल्पाला गरिबांच्या आणि देशाच्या विरोधातील अर्थसंकल्प मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंब्रा तहसीलदार कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून आणि चुलीवर स्वयंपाक बनवून केंद्राचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाचे आयोजन कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान आणि युवक अध्यक्ष शानु पठाण यांनी केले होते. हे सरकार देश आणि गरिबांच्या विरोधातील आहेच, पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील व्यापारी, कारखानदार वर्गही देशोधडीला लागत आहे. आई वडीलांनी मोठ्या कष्टाने मुला मुलींना शिक्षण देऊन उच्च शिक्षित केले आहे. मात्र या मुलांसमोरचे भविष्य अंधकारमय झाले आहे. देशाचे पंतप्रधान अशा मुलांना पकोडे विकायला सांगत आहेत. रस्त्यावर हातगाड्या लावून पकोडे विकण्यासाठीच आम्ही मुलांना शिक्षित केले आहे का? असा सवाल उपस्थित करीत आमदार आव्हाड यांनी मोदी यांच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला. तर राज्याचे सरकार चालविणाºया फडणवीस सरकारचा समाचारही घेतला. देशात आणि राज्यात जातीय द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. विरोधकांची पोलिसांच्या बळावर मुस्कटदाबी केली जात आहे. विरोधकांवर जरब बसावी म्हणून भुजबळ यांच्यासारख्यांना कारागृहाच्या बाहेर येऊ दिले जात नाही. हे सरकार सत्तेवर येताच देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान यावेळी चुलीवर बनविण्यात आलेले अन्न भक्षण मोर्चेकर्त्यांनी केले.



 

Web Title: NCP's unique rally against the Central Government in Thane;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.