निधी अभावी जेतवन नगर उपेक्षित

By admin | Published: June 9, 2015 10:49 PM2015-06-09T22:49:03+5:302015-06-09T22:49:03+5:30

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागातील प्र.क्र .७ जेतवन नगरची भौगोलिक दृष्ट्या व्याप्ती मोठी आहे.

Necessary funding neglected the city of Jivvan | निधी अभावी जेतवन नगर उपेक्षित

निधी अभावी जेतवन नगर उपेक्षित

Next

उमेश जाधव, टिटवाळा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागातील प्र.क्र .७ जेतवन नगरची भौगोलिक दृष्ट्या व्याप्ती मोठी आहे. यात जेतवन नगर, तिप्पना नगर, एनआरसी कॉलनी, बल्याणी, ऊंभर्णी, मोहिली आदी लोकवस्त्या तसेच काही गावांचा समावेश होतो. या सर्व लोकवस्त्यांचा विकास साधण्याकरिता नगरसेवक मयूर पाटील यांनी पालिका प्रशासनाशी विकास कामासंदर्भात पाठपुरावा करून प्रभागाचा विकास साधण्याचा अपुरा प्रयत्न केला आहे. तर बल्याणी गावाचा बहिष्कार उठवून त्याला पालिकेत समाविष्ट केले.
येथे काही विकास कामे झाली आहेत. परंतु उर्वरीत कामांसाठी निधी नसल्याची सबब सांगून प्रशासन असहकार्य करीत आहे. दुसरीकडे शहरी भागातील प्रभागांना निधी कसा काय दिला जातो या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते उत्तर देण्यास टाळाटाळ करतात.
या प्रभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होऊन नागरी वस्त्या निर्माण झाल्या आहेत. या वस्त्यांचा विकास कधी होणार असा नाराजीचा सूरही या प्रभागात आहे. तर पावसाळा ऐन तोंडावर आला असताना या प्रभागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अशा स्थितीत नगरसेवक काय करतात? असा नागरीकांचा सवाल आहे.

प्रभागाचा विस्तार भोगौलिक दृष्ट्या खूप मोठा आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. दहा कोटीच्या विकास कामांच्या फाईल पालिका प्रशासनास पाठविल्या आहेत. त्या मंजूर होण्यास विलंब लागत असल्याने विकास कामे थांबली आहेत.
- मयूर पाटील, नगरसेवक, प्र.क्र .७ जेतवन नगर.

आदिवासी वस्तीचा विकास, प्रभागाती पायवाट, गटारे, बल्याणीतील नवीन शाळा निर्मिती, उंभर्णी आणि टिप्पन नगर शाळांची दुरूस्ती, तलावातील गाळ काढणे, रस्त्यांवर दिवाबत्ती, नविन पाईप लाईन,रोहीत्र मंजूरी अशा प्रकारची छोटी कामे केली आहेत. मात्र मोठ्या विकास कामांच्या नावाने मात्र, ठणाणा
आहे.

Web Title: Necessary funding neglected the city of Jivvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.