‘सीएए’तील चांगले-वाईट लोकांना समजावून सांगण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 01:05 AM2019-12-28T01:05:33+5:302019-12-28T01:05:43+5:30
राम नाईक यांचे मत : ठाण्यात ‘अभाविप’चे ५४ वे अधिवेशन
ठाणे : पुस्तकी किडा न होता सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या आजूबाजूला, समोर काय होते, याची जाणीव विद्यार्थ्यांकडे असायला हवी. घडणाऱ्या घटनांवर त्यांनी आपले मत मांडायला पाहिजे. आताही घडत असलेल्या नागरिकत्व कायदा, सीएएविषयी प्रथम समजून घ्या. त्यानंतर त्यातील चांगले काय, वाईट काय, हे लोकांपुढे जाऊन सांगण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी शुक्रवारी येथील विद्यार्थ्यांना केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) ५४ वे कोकण प्रदेश अधिवेशन स्व.प्रा. मोहन आपटेनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे सुरू आहे. या तीनदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभाविपचे हे ५४ वे अधिवेशन म्हणजे हा काही छोटा काळ नाही. एबीव्हीपीचे नियमित दरवर्षी अधिवेशन घेत आहेत. अन्य काही संघटना केवळ कागदावर, फोटोत दिसत असल्याचेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आणून दिले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन वयातच वैचारिक बैठक निर्माण करून आजूबाजूला घडणाºया घटनांवर विचार करून मत मांडण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. यावेळी नाईक यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणदेखील विद्यार्थ्यांपुढे कथन केली.
दरम्यान, यावेळी व्यासपीठावरील प्रमुख अतिथी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, हरीश दुधाडे, एबीव्हीपीचे अध्यक्ष प्रा. मंदार भानुशे आदींचीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शपर भाषणे झाली.
चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी चार मंत्र
च्यावेळी नाईक यांनी त्यांच्या शालेय जीवनातील रोज २५ सूर्यनमस्कार घालण्याची शिस्तही यावेळी विद्यार्थ्यांना अवगत करून दिली. तर, चांगले व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी स्माइल म्हणजे हसतमुख राहिले पाहिजे, यासह चांगले काम करणाऱ्यांचे कौतुककेले पाहिजे.
च्अहंकार बाळगून दुसºयांविषयी वाईट बोलू नये आणि कोणतेही काम अधिक चांगले कसे होईल, याचा मार्ग शोधत राहिला पाहिजे आदी चार मंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.