हप्तेखोरीच्या चौकशीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:49 AM2021-09-07T04:49:33+5:302021-09-07T04:49:33+5:30
ठाणे : नगरसेवकांपैकी किती जणांची कार्यालये अनधिकृत आहेत, याचा विचार करून ती आधी तोडून एक आदर्श निर्माण करावा, नगरसेवकांनी ...
ठाणे : नगरसेवकांपैकी किती जणांची कार्यालये अनधिकृत आहेत, याचा विचार करून ती आधी तोडून एक आदर्श निर्माण करावा, नगरसेवकांनी ठरविले तर प्रभागात कुठेही फेरीवाले बसणार नाहीत. फेरीवाल्यांकडून हप्ते कोण कोण गोळा करतो, कोणापर्यंत ते हप्ते जातात, याची चौकशीची गरज असल्याचे भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी सांगितले.
भाजपचे नगरसेवक नारायण पवार आणि मिंलिद पाटणकर यांनीदेखील फेरीवाल्यांमध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे सांगितले. ज्या वेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस एकच सुरक्षारक्षक पुढे गेला, इतर मात्र १०० मीटर लांब उभे होते, त्यामुळे त्यांना प्रशिक्षण नव्हते का? असा सवाल नगरसेवक नरेश मणेरा यांनी केला. त्यामुळे एवढा हल्ला होत असतानाही लांब राहणाऱ्या इतरांची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.
स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनीदेखील फेरीवाला धोरण राबविण्याबरोबर शहरात कुठेही अनधिकृत फेरीवाले बसणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी फेरीवाला दादा गाडी भाड्याने देऊन प्रत्येक गाडीमागे ५० रुपये दिवसाला भाडे घेत असल्याचा आरोपही केला. असे हल्ले रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण देणे गरेजेचे असून अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्त अधिक देण्याची मागणी उपमहापौर पल्लवी कदम यांनी केली. सुरक्षारक्षक एकच होता, बाकीचे कुठे होते, त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी सभागृह नेते अशोक वैती यांनी केली.