इतिहासाच्या अभ्यासासाठी झपाटलेपण आणि वेड असावं लागतं - डॉ. सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 05:26 PM2019-06-01T17:26:36+5:302019-06-01T17:30:56+5:30

महाराजा यशवंतराव होळकर चरित्रात्म्क कादंबरीचे शानदार प्रकाशन करण्यात आले. 

Need for speed study and craze for history studies - Dr. Sachchidanand Shevade | इतिहासाच्या अभ्यासासाठी झपाटलेपण आणि वेड असावं लागतं - डॉ. सच्चिदानंद शेवडे

इतिहासाच्या अभ्यासासाठी झपाटलेपण आणि वेड असावं लागतं - डॉ. सच्चिदानंद शेवडे

Next
ठळक मुद्देइतिहासाच्या अभ्यासासाठी झपाटलेपण आणि वेड असावं लागतं - डॉ. सच्चिदानंद शेवडेमहाराजा यशवंतराव होळकर चरित्रात्म्क कादंबरीचे प्रकाशनइतिहासाकडे पाहण्याची दृष्टी बदला - डॉ. सच्चिदानंद शेवडे

ठाणे : इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी बदला तरच खरा इतिहास समजेल. इतिहासात जे घडलं त्याचा बोध घेऊन वाटचाल केली समाजात चांंगलं घडेल. इतिहासाच्या अभ्यासासाठी झपाटलेपण आणि वेड असावं लागतं. इतिहासाच्या मूळाशी जावून पूर्वग्रह बाजूला ठेवून वाचा. असे परखड मत  सुप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी मांडले. 

      व्यास क्रिएशन्स् प्रकाशित आणि अनंत शंकर ओगले लिखित महाराजा यशवंतराव होळकर या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. मराठी ग्रंथ संग्रहालय आणि व्यास क्रिएशन्स् आयोजित पुस्तक आदान प्रदान महोत्सवाच्या विशेष सत्रात ते बोलत होते. यावेळी मराठी ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष संजीव ब्रह्मे, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर उपस्थित होते. इतिहासाला का, कधी,कुठे, कसं हे प्रश्न विचारायचे असतात. आपण ब्रिटिशांच्या चष्म्यातून इतिहास पाहतो आणि वाचतो. पण आता विचार बदला आणि नजरही बदला. इतिहासाचं विहंगावलोकन करा. महाराजा यशवंतराव होळकर हे महान योद्धे होते, पराक्रमी होते, त्यांना योग्य साथ आणि न्याय मिळाला असता तर या देशावर राज्य करण्याचं ब्रिटिशांंचं धाडस झालं नसतं. असे सच्चिदांनंद शेवडे पुढे म्हणाले. पुस्तक आदान महोत्सवात अभिवाचन आणि काव्यवाचनाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. ठाणे अणि परिसरातील रसिकांनी यात मोठ्या संख्येने भाग घेतला. वासंती वर्तक, श्रीरंग खटावकर, संतोष वेरूळकर,वृृंंदा दाभोळकर, सुनिता फडके यांनी मार्गदर्शन केले. व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. आकाश भडसावळे यांनी निवेदन केले.

Web Title: Need for speed study and craze for history studies - Dr. Sachchidanand Shevade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.