रामजन्मभूमीचे कार्य पुढे नेण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 01:45 AM2019-04-15T01:45:12+5:302019-04-15T01:45:18+5:30

विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व. अशोक सिंघल यांनी रामजन्मभूमी आंदोलनाची चळवळ उभी केली.

The need to take the work of Ram Janmabhoomi forward | रामजन्मभूमीचे कार्य पुढे नेण्याची गरज

रामजन्मभूमीचे कार्य पुढे नेण्याची गरज

Next

डोंबिवली : विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व. अशोक सिंघल यांनी रामजन्मभूमी आंदोलनाची चळवळ उभी केली. देशभरात हिंदू ऐक्याचे वातावरण निर्माण केले, त्यामुळे ती चळवळ पुढे नेणे, हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. यापुढेही रामजन्मभूमी हा विषय पूर्णत्वास जायलाच हवा, हा संकल्प आपण सगळ्यांनी करणे रामनवमीनिमित्त करायला हवे, असे आवाहन विहिंपचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी केले.
‘श्रद्धेय अशोक सिंघल राष्ट्रीय प्रतिष्ठान’ या संस्थेच्या शनिवारी ठाण्यात झालेल्या शुभारंभ सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ठाण्यात शनिवारी टिपटॉप प्लाझा येथे हा सोहळा झाला. त्यावेळी परिषदेचे संघटन महामंत्री विनायक देशपांडे, कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंद जिंदल, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे संदीप लेले, प्रा. वरदराज बापट, अरविंद जोशी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
अलोक कुमार म्हणाले की, देशामध्ये खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे वातावरण आहे. रा.स्व. संघाचे प्रचारक म्हणून सिंघल यांनी मोठे योगदान दिले. स्वत:ला पूर्णपणे मातृभूमीसाठी झोकून देऊन एका विशिष्ट उद्देशाने सतत कार्यरत राहणे, हे सोपे नसते. सिंघल हे तसेच जगले. त्यामुळेच ते विचारांच्या रूपाने प्रत्येकाच्या मनामनांत आजही जिवंत आहेत.
या प्रतिष्ठानतर्फे हिंदुत्वाचा प्रसार करणाºया व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांचे मनोधैर्य वाढवणे हे प्रतिष्ठानच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असल्याचे संस्थापक संजय ढवळीकर यांनी सांगितले.
हिंदुत्वाचा प्रसार, प्रचार करणे, हा प्रतिष्ठान स्थापण्यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. प्रतिष्ठानतर्फे यंदा पहिला पुरस्कार व्याख्याते, लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना अलोक कुमार यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ठाण्यातील स्वामिनारायण मंदिराचे विश्वस्त स्वामी शास्त्री, स्वामी विवेक आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि २५ हजारांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.
>‘स्वातंत्र्य मिळवले’ असे शिकवा - शेवडे
डॉ. शेवडे यांनी ‘मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे’ अशी खिल्ली उडवणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. हिंदू हा संस्कार असून ती जगण्याची पद्धत आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. संस्कार हे महत्त्वाचे आहेत. आपली शिक्षणपद्धती ही चुकीची असून नकारात्मकता शिकवते. आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नसून ते आपण मिळवले आहे. मिळाले ही भीक असून मिळवले यात त्याग आहे, बलिदान आहे. संघर्ष आहे, अभिमान आहे. हे युवकांना शिकवणे आवश्यक आहे.

Web Title: The need to take the work of Ram Janmabhoomi forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.